शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

आर्थिक गर्तेतील सोलापूर जिल्हा बँकेला ११ कोटींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 16:04 IST

लवादाने दावा फेटाळला; व्यवस्थापन आता दिवाणी न्यायालयात जाणारं

ठळक मुद्देन्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश माधव मकरे यांनी व्याजासह व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीला पैसे देण्याचा आदेशलवादाने आदेशात विविध प्रकारची ११ कोटी ३ लाख ८५ हजार १०५ रुपये इतकी रक्कम द्यावी असे म्हटले आहेव्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीचे काम रद्द करणाºया जिल्हा बँकेने हेच कोअर बँकिंगचे काम दुसºया कंपनीला दिले होते

सोलापूर : मोठ्या आर्थिक गर्तेतून सावरत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला लवादाच्या निर्णयामुळे ११ कोटी ४ लाख रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे लवादाने कोअर बँकिंगचे काम करणाºया व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीचा दावा संपूर्णपणे मान्य करून बँकेचा दावा फेटाळला. 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोअर बँकिंगचे काम करण्यासाठी नागपूरच्या व्हर्च्युअल गॅलेक्सी इन्फोटेक या नामांकित कंपनीला २०१२ मध्ये पाच वर्षांसाठी दिले होते. त्याप्रमाणे त्या कंपनीने जिल्हा बँकेचे कोअर बँकिंगचे काम सुरु ठेवले. दरम्यान, बँकेने या कंपनीचे काम अचानक २०१७ मध्ये थांबवून दुसºया कंपनीला दिले. कराराप्रमाणे केलेल्या कामाची कंपनीची सुमारे ८ कोटी ३८ लाख ५ हजार ८८४ इतकी रक्कम देण्याची मागणी व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीने केली. मात्र बँकेने दिली नाही. रितसर नोटीस दिल्यानंतरही बँकेने दाद दिली नाही. त्यामुळे कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली.

उच्च न्यायालयाने यावर लवाद नेमण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश माधव मकरे यांनी व्याजासह व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीला पैसे देण्याचा आदेश दिला. लवादाने आदेशात विविध प्रकारची ११ कोटी ३ लाख ८५ हजार १०५ रुपये इतकी रक्कम द्यावी असे म्हटले आहे. लवादाच्या निर्णयामुळे ही रक्कम बँकेला द्यावी लागणार आहे. व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनीचे काम रद्द करणाºया जिल्हा बँकेने हेच कोअर बँकिंगचे काम दुसºया कंपनीला दिले होते. या कंपनीलाही बँक पैसे देत आहे. लवादाच्या निर्णयामुळे बँकेला दोन्ही कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. जिल्हा बँकेनेही व्हर्च्युअल गॅलेक्सी या कंपनी विरोधात (काऊंटर) दावा दाखल केला होता. लवादाने व्हर्च्युअल कंपनीचा दावा पूर्णपणे मान्य करीत असताना बँकेचा दावा मात्र फेटाळला आहे.

विमान भाड्याचीही रक्कम लवादाच्या सुनावणीला एकवेळ जिल्हा बँकेचे कोणीही उपस्थित नव्हते. व्हर्च्युअल कंपनीने आम्ही सुनावणीला विमानाने येत असल्याने विमान भाड्याचे ३५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. लवादाने कंपनीची मूळ येणे रक्कम ८ कोटी ३८ लाख ५ हजार ८८४ रुपये, २४ मे २०१७ ते ७ एप्रिल २०१९ या कालावधीचे दोन कोटी ५७ लाख ४७१ रुपये व्याज, लवादाची फी ८ लाख ४३ हजार ७५१ रुपये व विमान भाडे ३५ हजार रुपये अशी एकुण ११ कोटी ३ लाख ८५ हजार १०५ रुपये इतकी रक्कम देण्याचे आदेशात नमूद केले आहे.

निर्णयाची प्रत मिळाली आहे. वाचल्यानंतर बारकावे समजतील. निर्णयाचा अभ्यास करुन सोलापूर जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात येईल. आमचा दावा फेटाळण्याचे कारण काय? , निकाल वाचल्यानंतर समजेल.- शैलेश कोतमिरे, प्रशासक, मध्यवर्ती बँक 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्र