गौडगांवजवळ एसटी बस पलटी, चालक, वाहकासह १० प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:00 IST2018-02-01T11:59:49+5:302018-02-01T12:00:54+5:30
बार्शी तुळजापूर बस गौडगाव जवळील नागोबा मंदिराजवळ पलटी झाली. या अपघातात बसचा चक्काचुरा झाला होता. या अपघातात चालक, वाहकासह दहा जण गंभीर जखमी झाले

गौडगांवजवळ एसटी बस पलटी, चालक, वाहकासह १० प्रवासी जखमी
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : बार्शी तुळजापूर बस गौडगाव जवळील नागोबा मंदिराजवळ पलटी झाली. या अपघातात बसचा चक्काचुरा झाला होता. या अपघातात चालक, वाहकासह दहा जण गंभीर जखमी झाले. आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, बार्शी आगाराची बार्शी तुळजापुर बस क्रमांक (एम.एच. १४ बिटी २६४४) प्रवासी घेवून प्रवास करत असताना गौडगाव जवळ येताच बस रस्ता सोडून खाली आल्याने पलटी झाली. या अपघातात चालकासह दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी उस्मानाबाद रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे स्टेरिंग जाम झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र या अपघातात बसचा चक्काचुरा झाला.