जीवे ठार मारण्याची धमकी देत नववीतील मुलाकडून दहावीच्या मुलाने १० लाख रुपये उकळले; दोघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: July 11, 2023 13:07 IST2023-07-11T12:12:57+5:302023-07-11T13:07:06+5:30

फिर्यादी इरावती यांचा मुलगा हा शहरातील एका नावाजलेल्या शाळेत नववीचे शिक्षण घेत आहे.

10 lakh rupees extorted by 10th grader from 9th grader by threatening to kill; A crime against both | जीवे ठार मारण्याची धमकी देत नववीतील मुलाकडून दहावीच्या मुलाने १० लाख रुपये उकळले; दोघांवर गुन्हा

जीवे ठार मारण्याची धमकी देत नववीतील मुलाकडून दहावीच्या मुलाने १० लाख रुपये उकळले; दोघांवर गुन्हा

सोलापूर : नववीतील मुलाला मित्रानेच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी दहा लाख रूपये घेतल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दहावीतील मुलासह त्याच्या दाजीवर ही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सिडगिडी ( वय ३८, रा. जोडभावी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी इरावती यांचा मुलगा हा शहरातील एका नावाजलेल्या शाळेत नववीचे शिक्षण घेत आहे. त्याची मैत्री त्याच शाळेतील दहावीतील मुलाशी झाली. दरम्यान, फिर्यादीचा मुलाने आपल्या घरातील कपाटात ठेवलेल्या पैसे घेऊन मित्रासोबत खर्च केला. एके दिवशी आरोपी मुलाने उसने पैशाची मागणी केली. त्यानंतर सुरूवातीला घेतलेले पैशे परत दिले. अशाच प्रकारे पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादीच्या मुलाने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यास व त्याच्या आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले. अशा आशयाची फिर्याद सिडगिद्दी यांनी दिली आहे. या वरून दहावीतील मुलासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: 10 lakh rupees extorted by 10th grader from 9th grader by threatening to kill; A crime against both