Video - पैशांचा पाऊस! कमी पडले तर पुन्हा आणेन; युट्यूबरने फ्लायओव्हरवरुन उडवले ५० हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 11:15 IST2025-03-02T11:13:58+5:302025-03-02T11:15:06+5:30
२०० रुपयांच्या नोटांचं बंडल हवेत उडवताना पाहून उड्डाणपुलाखाली लोकांची मोठी गर्दी जमली. महिला, पुरुष आणि लहान मुलांची नोटा उचलण्यासाठी झुंबड उडाली.

Video - पैशांचा पाऊस! कमी पडले तर पुन्हा आणेन; युट्यूबरने फ्लायओव्हरवरुन उडवले ५० हजार
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमधील एका युट्यूबरने उड्डाणपुलावरून २०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला. २०० रुपयांच्या नोटांचं बंडल हवेत उडवताना पाहून उड्डाणपुलाखाली लोकांची मोठी गर्दी जमली. महिला, पुरुष आणि लहान मुलांची नोटा उचलण्यासाठी झुंबड उडाली. युट्यूबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने एकाच वेळी ५० हजार रुपये उडवल्याचं म्हटलं आहे.
व्हायरल व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक गाणं वाजत आहे. पैशांची कमतरता नाही. ते संपले की मी ते बँकेतून घेऊन येईन असं युट्यूबरने म्हटलं आहे. नोटांचा पाऊस पाडणारा हा तरुण एक युट्यूबर आहे. तो त्याचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करत आहे.
#कानपुर यूट्यूबर ने फ्लाई ओवर से उड़ाए 50 हजार के नोट...
— ठाkur Ankit Singh (@liveankitknp) February 28, 2025
रुपए लूटने के लिए दौड़े लोग,पचास हजार रुपए के 200-200 के उड़ाए नोट,वीडियो सोशल मीडिया पर हुआ वायरल,चकेरी फ्लाई ओवर का मामला. #kanpur#viralvideo#sirfsuch#youtuberpic.twitter.com/HvKxrUFxHo
युट्यूबर बँकेच्या कर्मचाऱ्याला सांगतो की, त्याला नवीन नोटा हव्या आहेत. बँक कर्मचारी त्याला नकार देतो. तेव्हा तो तरुण म्हणतो की. १००० रुपयांचं बंडल बाहेर १५०० रुपयांना मिळतं. युट्यूबर बँकेच्या कर्मचाऱ्याला सांगतो की, त्याचे पैसे युट्यूब आणि फेसबुकवरून येतात. तुमच्या बँकेत मला नवीन नोटा मिळाल्या नाहीत, तर मी आत्ताच बँकेत येऊन माझं अकाऊंट बंद करेन. यानंतर तो बाईकने इंडसइंड बँकेत जातो.
५० हजार रुपये उडवले
थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये युट्यूबर बँकेतून बाहेर पडताना दिसतो. त्याच्या हातात नोटांचं बंडल होतं. व्हिडिओमध्ये २०० रुपयांच्या नोटांचं संपूर्ण बंडल उडवताना दिसत आहे. जाजमऊचे इन्स्पेक्टर अजय मिश्रा यांनी चौकशीनंतर तरुणावर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.