Youth Fell On Dance Floor: 'चुम्मा दे' गाण्यावर रिसेप्शनमध्ये डान्स करत होता तरुण; अचानक खाली कोसळला, मित्रांना वाटले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 15:05 IST2022-01-23T15:04:17+5:302022-01-23T15:05:40+5:30
Youth Fell On Dance Floor: घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शाहपूर पोलीस ठाणे हद्दीत जामुन ढाना गाव आहे. येथील एका लग्न समारंभात ३२ वर्षीय तरुण डान्स करत होता.

Youth Fell On Dance Floor: 'चुम्मा दे' गाण्यावर रिसेप्शनमध्ये डान्स करत होता तरुण; अचानक खाली कोसळला, मित्रांना वाटले...
मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एका लग्न समारंभावेळी खळबळजनक घटना घडली आहे. रिसेप्शनवेळी एक तरुण नाचता नाचता अचानक खाली कोसळला. तेव्हा लोकांना काहीच समजले नाही. मित्रांसह लोकांना वाटले की हा त्याच्या डान्समधीलच प्रकार आहे किंवा तो नाटक करतोय. मात्र, काही वेळातच लोकांच्या गांभीर्य लक्षात आले आणि धावपळ उडाली. बेशुद्ध अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शाहपूर पोलीस ठाणे हद्दीत जामुन ढाना गाव आहे. येथील एका लग्न समारंभात ३२ वर्षीय तरुण डान्स करत होता. त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये तो आला होता. शुक्रवारी लग्न झाले, शनिवारी रिसेप्शन होते. डीजे सुरु असल्याने तो नाचत होता, काही वेळातच तो नाचता नाचता खाली कोसळला.
तिथे उपस्थित लोकांनी सांगितले की, आम्हाला वाटले की त्याच्या डान्सचाच प्रकार आहे. परंतू तो काही वेळ तसाच पडल्याने काहीतरी विपरित घडल्याचे लक्षात आले आणि आम्ही त्याच्याकडे धाव घेतली. त्याला उचलले परंतू तोवर त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टेमला पाठविला आहे. रिपोर्टनंतर योग्य कारण समजणार आहे. त्या तरुणाला पाच वर्षांची मुलगी आहे, तसेच त्याला तीन बहीणी आहेत. आज त्याचा मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांकडे सोपविला आहे.