Viral Video : सोशल मीडियावर कालपासून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी दुसऱ्या तरुणीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये ती तरुणी "तू आधी माझ्या बॉयफ्रेंडला भैया म्हणायचीस, आता त्याला बाबू का म्हणतेस ते सांग..." असं म्हणत मारहाण करत आह. हा व्हिडीओ कानपूरमधील आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती कधी तिचे केस धरून ओढते, तर कधी तिला थप्पड आणि लाथ मारते हे स्पष्टपणे दिसत आहे. मारहाण होणारी मुलगी मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान, ती अनेक वेळा रागाने ओरडते, "तू माझ्या बॉयफ्रेंडला बाबू का म्हणाली?"
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
कानपूरमधील यशोदा नगर बायपासवर ही हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी प्रभावी मुलगी बारा परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे एक मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, ती महिला किमान ११ वेळा थप्पड मारते, दोनदा लाथ मारते आणि दुसऱ्या मुलीला तिचे केस धरून रस्त्यावर ओढते. जवळचे लोक पाहत राहतात, कोणीही त्यांच्या मध्ये येऊन वाद थांबवत नाही.
व्हायरल व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. व्हिडिओमधील मुली कोण आहेत आणि त्या सध्या कुठे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्हींकडून कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. लेखी तक्रार मिळाल्यास कायद्यानुसार त्यावर कारवाई केली जाईल. व्हिडिओची तारीख आणि घटना कोणत्या परिस्थितीत घडली याचीही पोलिस चौकशी करत आहेत.
Web Summary : A video from Kanpur shows a woman assaulting another for calling her boyfriend 'babu' after previously addressing him as 'bhaiya'. The attacker repeatedly slaps, kicks, and pulls the victim's hair. Police are investigating the viral video, awaiting a formal complaint.
Web Summary : कानपुर में एक लड़की ने दूसरी लड़की को अपने बॉयफ्रेंड को 'बाबू' कहने पर पीटा। पहले 'भैया' कहती थी। वीडियो में मारपीट स्पष्ट दिख रही है। पुलिस जाँच कर रही है, शिकायत का इंतजार है।