Yellow bullfrogs seen in madhya pradesh see Viral video | Video : आता हिरवे नाही तर पिवळे बेडूक घेताहेत पावसाचा आनंद; व्हिडीओ पाहून चकीत व्हाल

Video : आता हिरवे नाही तर पिवळे बेडूक घेताहेत पावसाचा आनंद; व्हिडीओ पाहून चकीत व्हाल

पावसाळा आल्यानंतर निसर्गाचं रुपंच पालटतं. निसर्गातील वेगवेगळे जीव पावसाचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे पावसाळा आला की घराच्या बाहेर डराव डराव असा आवाज यायला सुरूवात होते. कधीही न दिसणारे बेडून पावसाळ्यात मात्र बाहेर येतात.  सध्या सोशल मीडियावर बेडकांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणाल यात नवीन असं काय? पण हे बेडूक हिरवे नाही तर पिवळ्या रंगाचे आहेत. असे बेडूक तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील. 

इंडियन फॉरेस्ट अधिकारी प्रवीन कसवान यांनी या पिवळ्या बेडकांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. कितीतरी पिवळे बेडुक पावसाचा पुरेपूर आनंद घेताना, पावसात आवाज करत उड्या मारताना दिसतील. परदेशातील नाही तर पिवळ्या बेडकांचा हा व्हिडीओ भारतातलाच आहे. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमधील ही दृश्यं आहेत. हे इंडियन बुलफ्रॉग आहेत असं कसवान यांनी ट्वीटमध्ये  नमुद केले आहे.

पावसाळ्यात ते प्रजननच्या काळात मादी बेडकाला आकर्षित करण्यासाठी आपला रंग बदलतात अशी माहितीदेखील कसवान यांनी दिली आहे. नेहमी लांबून दिसत असलेल्या बेडकांना तुम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून जवळून पाहू शकता. तुमच्याप्रमाणेच स्थानिकांनीही पिवळ्या रंगाचे बेडूक पहिल्यांदाच पाहिल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या बेडकांचा कोरोनाच्या संसर्गाशी आणि टोळधाडीशी काही संबंध असावा का? अशी भीती लोकांच्या मनात आहे. 

आयएफएस अधिकारी प्रवीन कासवान यांनी पिवळ्या बेडकांचा टोळधाडीशी काही संबंध नाही अशी माहिती दिली आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रसिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १ हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि  २०० पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले आहे. 

क्यों हिला डाला ना? रशियाने लस तयार केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा धुमाकूळ

वाह, कमाल! फोटोग्राफरनं उभा केला कॅमेराचा बंगला; एका मुलाचं नाव ठेवलं Cannon तर दुसऱ्याचं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Yellow bullfrogs seen in madhya pradesh see Viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.