जगातली सर्वात सुंदर फिटनेस मॉडलचे फोटो व्हायरल, बालीमध्ये बीचवर एन्जॉय करताना दिसली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:09 IST2022-04-27T13:08:52+5:302022-04-27T13:09:31+5:30
Alica Schmidt : २३ वर्षीय जर्मन रनर ट्रेनिंग कॅम्प सुरू होण्याआधीच बालीच्या बीचवर सुट्टी एन्जॉय करताना दिसली. तिने काही फोटोजही शेअर केले आहे.

जगातली सर्वात सुंदर फिटनेस मॉडलचे फोटो व्हायरल, बालीमध्ये बीचवर एन्जॉय करताना दिसली!
स्टार खेळाडू एलिसा श्मिड (Alica Schmidt) बालीमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसली. बीचवरील फोटो शेअर केल्यावर फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे. एलिसाला ही जगातली सर्वात सुंदर एथलीट म्हटलं जातं. २०१७ मध्ये एका मॅगझिनने तिला हा किताब दिला होता. आता ती पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
२३ वर्षीय जर्मन रनर ट्रेनिंग कॅम्प सुरू होण्याआधीच बालीच्या बीचवर सुट्टी एन्जॉय करताना दिसली. तिने काही फोटोजही शेअर केले आहे. ती नुकतीच सुट्टी एन्जॉय करून परत आली. ती आता ट्रॅकवर जोरदार प्रक्टिस करत आहे.
एलिसा इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या ट्रेनिंगचे व्हिडीओज आणि फोटोज शेअर करत असते. ती याआधी २०२० टोकियो ऑलम्पिकमधून बाहेर झाली होती. ती आता पुन्हा जोमाने तयारीला लागली आहे. रेसिंग सीजनच्या सुरूवातीआधीच ती दिवसरात्र मेहनत घेत आहे.
बालीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एलिसाने लिहिलं की, उद्यापासून पुन्हा उन्हात मेहनतीसाी तयार आहे. या फोटोवर कमेंट करत लोक तिच्या लूकचं भरभरून कौतुक करत आहे. एका यूजरने लिहिलं की, अमेजिंग एंजल.
एलिसा आपल्या लूक्ससाठी फारच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २८ लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पूमा आणि इतर फिटनेस ब्रॅन्डला प्रमोट करते. ती तिच्या फॅन्ससाठी मोटिवेशनल मेसेजही शेअर करत असते.
आपल्या फोटोजमुळे एलिसा जगातली सर्वात जास्त पॉप्युलर फिटनेस मॉडलही राहिली आहे. २०१७ मध्ये एका मॅगझिनने तिला जगातली सर्वात सुंदर एथलीट असा किताब दिला होता.