मित्राच्या मृत्यूने दुखावलेल्या जगातल्या सर्वात Cute कुत्र्याचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 14:30 IST2019-01-21T14:28:09+5:302019-01-21T14:30:32+5:30

जगातला सर्वात सुंदर पॉमेरियन कुत्रा 'बू' याचं नुकतंच निधन झालं. हा कुत्रा १२ वर्षांचा होता.

Worlds cutest dog boo dies of heartbreak | मित्राच्या मृत्यूने दुखावलेल्या जगातल्या सर्वात Cute कुत्र्याचा मृत्यू!

मित्राच्या मृत्यूने दुखावलेल्या जगातल्या सर्वात Cute कुत्र्याचा मृत्यू!

जगातला सर्वात सुंदर पॉमेरियन कुत्रा 'बू' याचं नुकतंच निधन झालं. हा कुत्रा १२ वर्षांचा होता. त्याचं मन दुखावल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. कुत्र्याच्या मालकाचं म्हणणं आहे की, २०१७ मध्ये सर्वात चांगला मित्र 'बडी' मरण पावल्यानंतर 'बू'ला हृदयाशी निगडीत समस्या होऊ लागली होती. 'बू'च्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर त्याच्या मालकाने हे लिहिले आहे. 

'बू' हा इंटरनेटवर सर्वात जास्त लोकप्रिय कुत्रा होता. फेसबुकवर त्याचे दीड कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा टीव्हीवरही दिसला आहे. इतकेच नाही तर त्याच्या नावावर पुस्तकही आलं आहे. या पुस्तकांचं नाव 'बू- द लाइफ ऑफ वर्ल्ड्स क्यूटेस्ट डॉग'.

मीडिया रिपोर्टनुसार, जगातला सर्वात क्यूट कुत्रा 'बू' चा मृत्यू शनिवारी झोपेतच झाला. 'बू'ने त्याचा सर्वात चांगला मित्र 'बडी' ला सप्टेंबर २०१७ मध्ये गमावले होते. दोघांनी ११ वर्ष सोबत घालवली होती. बू हा कुत्रा इतका लोकप्रिय होता की, अनेक सेलिब्रिटी त्याला भेटायलाही येत असतं. इतकेच नाही तर तो एका अमेरिकन एअरलाइन्सचा अॅम्बेसेडर सुद्धा होता. 

Web Title: Worlds cutest dog boo dies of heartbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.