Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:43 IST2025-05-31T19:42:19+5:302025-05-31T19:43:30+5:30
Womens Dance Viral Video: महिलांचा डान्स पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे.

Viral Video: ढोल- ताशाच्या तालावर महिलांचा हटके डान्स, थेट जमिनीवर लोळल्या; व्हिडीओ व्हायरल!
सोशल मीडियावर कधी काही पाहायला मिळेल, याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ आता धुमाकूळ घालत आहे, ज्यात दोन महिला ढोल ताशाच्या तालावर भन्नाट डान्स करत आहेत. या महिल्या थेट जमिनीवर लोळत नाचत आहेत, त्यांचा डान्स पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला दोन महिला जमिनीवर झोपून डान्स करताना दिसतात. त्यानंतर एक महिला येऊन डान्सचे कौशल्य दाखवते. त्यानंतर तिघीही उठून पुन्हा डान्स करायला लागतात. डान्स करणाऱ्या महिलांचा उत्साह पाहून आजूबाजुचे लोक आश्चर्यचकीत झाले. तिन्ही महिलांचा समन्वय आणि ऊर्जा पाहण्यासारखी आहे.
@deepaksing1695 या नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केला. या व्हिडीओ कमेंट करताना अनेकांनी या महिलांचे कौतुक केले. एका जणाने म्हटले आहे की, "या महिलांनी त्यांच्या डान्सने वादळ आणले." दुसऱ्याने म्हटले की, "ढोल ताशाचा आवाज कानावर पडला की, कोणीही स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकत नाही." तिसऱ्याने म्हटले आहे की, "या तिन्ही महिलांनी भन्नाट डान्स केला."