महिलेचा आइस्क्रीमच्या दुकानातील विचित्र व्हिडीओ व्हायरल, आता होतीय ट्रोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 15:16 IST2019-07-05T15:12:59+5:302019-07-05T15:16:52+5:30
सोशल मीडियात आइस्क्रीमसंबंधी व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी आइस्क्रीम घेताना १० वेळा विचार कराल.

महिलेचा आइस्क्रीमच्या दुकानातील विचित्र व्हिडीओ व्हायरल, आता होतीय ट्रोल!
आइस्क्रीम खाणं हे जवळपास सगळ्याच लोकांना आवडतं. खासकरून लहान मुले आणि तरूणींना आइस्क्रीम फार आवडतं. मात्र, सोशल मीडियात आइस्क्रीमसंबंधी व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी आइस्क्रीम घेताना १० वेळा विचार कराल.
ट्विटरवर BlindDensetsu नावाच्या एका यूजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात एक महिला एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या फ्रिजमध्ये ठेवलेली आइस्क्रीम काढते आणि चाटते पुन्हा फ्रिजमध्ये ठेवते.
What kinda psychopathic behavior is this?! pic.twitter.com/T8AIdGpmuS
— Optimus Primal (@BlindDensetsu) June 29, 2019
सोशल मीडियावर आतापर्यंत हा व्हिडीओ ११ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक महिेलेच्या वागण्यामुळे चांगलेच संतापले आहेत. लोक कमेंट करून तिच्यावर टिका करत आहेत.
काही लोक इतके भडकले आहेत की, या गोष्टीसाठी महिलेला शिक्षा झाली पाहिजे. माझ्यासारख्या इम्यून सिस्टीम कमजोर असलेले लोक हे अजिबात सहन करू शकणार नाहीत. असं केल्याने कुणाच्या जिवालाही धोका होऊ शकतो.
व्हिडीओत दिसणारं स्टोर हे ब्लू बेल आइस्क्रीम स्टोर आहे. स्टोरने सुद्धा हा व्हिडीओ रिट्विट करून या घटनेची माहिती दिल्याबाबत धन्यवाद दिले आहेत. तसेच ही बाब गंभीर असून यावर ते काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कंपनी या महिलेचा शोध घेत आहे. ही महिला टेक्सासच्या लुफ्किनची राहणारी असून पोलीस तिच्यावर कारवाई करत आहेत.