Video : महिलेचा 13 सेकंदाचा डान्स व्हिडीओ व्हायरल, 10व्या सेकंदाला झालं ते पाहून जागेवरच उडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:29 IST2020-04-07T13:28:56+5:302020-04-07T13:29:17+5:30

अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण सध्या एका महिलेचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तसा नक्कीच पाहिला नसेल.

Women dance goes wrong, video goes viral api | Video : महिलेचा 13 सेकंदाचा डान्स व्हिडीओ व्हायरल, 10व्या सेकंदाला झालं ते पाहून जागेवरच उडाल!

Video : महिलेचा 13 सेकंदाचा डान्स व्हिडीओ व्हायरल, 10व्या सेकंदाला झालं ते पाहून जागेवरच उडाल!

सध्या लॉकडाऊनमुळे लोक घरात आहेत. अनेकांचं टॅलेन्ट समोर येत आहे. आपल्या रिकाम्या वेळात लोक त्यांची क्रिएटिव्हिटी वाढवत आहे. लोकांचे लॉकडाऊन दरम्यानचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण सध्या एका महिलेचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तसा नक्कीच पाहिला नसेल. तसेच हा व्हिडीओ पाहून काय करावं आणि काय करू नये हेही समजणार आहे.

यात एक महिला डान्स करत होती. 13 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण 10 व्या सेकंदाला काहीतरी घडलं. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय. लोकांना हा व्हिडीओ इतका का आवडला हे तुम्हीच बघा....

हा शॉकिंग व्हिडीओ @rahm3sh नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केलाय. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'तिने तिथेच रहायला पाहिजे होतं, जिथे ती होती'. हा व्हिडीओ आतापर्यंत 16 लाख वेळा पाहिला गेलाय, तर 85 हजार लाईक्स मिळाले आणि 23 हजार लोकांनी रिट्विट केलाय.

या 13 सेकंदाच्या व्हिडीओची सुरूवात महिलेच्या डान्सने होते. ती 8 व्या सेकंदाला एक भारी स्टेप करते. पण 10व्या सेकंदाला जे होतं ते बघून लोक थक्क होतात. मुळात असं होतं की, डान्स करताना महिलेचं संतुलन बिघडतं आणि ती थेट काचेच्या दरवाज्यावर पडते. आता लोकांना तिचं हे असं पडणं मजेदार वाटत आहे.

लोकांना एकच सांगणं आहे. घरात आहात तर मजा-मस्ती करा पण जरा सांभाळून करा. नाही तर हे असं होऊ शकतं.

Web Title: Women dance goes wrong, video goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.