Video: अरे बापरे! फूड ब्लॉगरने ज्वालामुखीच्या आत पिझ्झा शिजवला, व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 15:30 IST2023-07-15T15:28:42+5:302023-07-15T15:30:32+5:30
सोशल मीडियावर एका महिला ब्लॉगरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video: अरे बापरे! फूड ब्लॉगरने ज्वालामुखीच्या आत पिझ्झा शिजवला, व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
सोशल मीडियावर ब्लॉगरांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. यात ब्लॉगर वेगवेगळ्या ठिकाणची माहिती देत असतात, सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी चक्रावले आहेत.
या व्हिडीओत ही महिला ब्लॉगर धगधगत्या ज्वालामुखीत स्वयंपाक करत असल्याचे दिसत आहे. तिने बाहेर पडणाऱ्या लावावर पिझ्झा शिजवला. इतकंच नाही तर स्वयंपाक झाल्यावर मी स्वतः त्याची चाचणी करून माझ्या मित्रांना चाखायला दिल्याचे ती सांगत आहे. या महिलेने कोणतेही विशेष कपडे घातले नव्हते. म्हणजे थोडी जरी चूक झाली तर महिलेचा मृत्यू झाला असता.
इथे आहे जगातील सर्वात महागड्या आंब्यांची बाग, CCTV सह कडेकोट सुरक्षा, एका आंब्याची किंमत तब्बल...
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती कच्चा पिझ्झा जमिनीवर टाकून त्यावर झाकून टाकत आहे. काही वेळाने तो बाहेर काढतो आणि ब्लॉजेटला देतो. त्यानंतर तो आनंदाने खाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अलेक्झांड्राने सांगितले की, सध्या जोरदार वारे आहेत आणि हवामान खूप थंड आहे. जिथे पिझ्झा खाण्याचा स्वतःचा स्वैग असतो.
अलेक्झांड्रा व्यवसायाने फूड ब्लॉगर आहे आणि तिने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ २ जुलै रोजी शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ७१ हजारांहून अधिक लोकांनी ती पाहिली असून आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून दिल्या जात आहेत. अनेकांनी याला धाडसी कृत्य म्हटले, तर दुसरीकडे अनेकांनी याला मूर्खपणाचे कृत्य म्हटले. ग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेत असलेला देश आहे. २०२१ मध्ये येथे सर्वात मोठा स्फोट झाला. ज्याचा लावा कित्येक किलोमीटर दूर पसरला होता.