ती महिला स्मशानात सांगाड्यासोबत नाचत होती, पाहणाऱ्याची शुद्धच हरपली; फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 21:08 IST2021-09-14T21:07:50+5:302021-09-14T21:08:21+5:30
The woman was dancing with the skeleton in the cemetery : स्मशानातून जाणाऱ्या लोकांना धक्का बसला, त्यांना घाम फुटला आणि ते तिथून शांतपणे पळून गेले.

ती महिला स्मशानात सांगाड्यासोबत नाचत होती, पाहणाऱ्याची शुद्धच हरपली; फोटो झाले व्हायरल
लंडन: कल्पना करा की तुम्ही एखाद्या स्मशानभूमीतून जात आहात, जेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली, हातात सांगाडा घेऊन नाचताना एक स्त्री दिसते तेव्हा तुमची स्थिती काय होईल? असेच काहीसे ब्रिटनमधील यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या लोकांसोबत घडले. स्मशानातून जाणाऱ्या लोकांना धक्का बसला, त्यांना घाम फुटला आणि ते तिथून शांतपणे पळून गेले.
डेली मेलच्या अहवालानुसार, यॉर्कशायरमधील हल जनरल स्मशानभूमीची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक महिला हातात सांगाडा घेऊन डोलताना दिसत आहे. दफनभूमीतून जाणाऱ्या लोकांनी सांगितले की, ती महिला काही वेळ सांगाड्यासह डुलत राहिली, मग ती तिचे मूल असल्यासारखे त्याच्यासोबत लडिवाळ करू लागली. चित्रातील महिलेच्या पुढे आणखी एक सांगाडा दिसतो, जो बहुधा कुत्र्याचा असावा.
'हल जनरल' नावाच्या कब्रस्तानात ही महिला ननच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिच्या हातात एक सांगाडा आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, या महिलेला केवळ एकाच नव्हे तर स्मशानभूमीच्या सर्व सांगाड्यांसह पाहिले गेले आहे. ती अनेकदा स्मशानभूमी गाठते आणि अशा विचित्र गोष्टी करू लागते. कोणीही या स्त्रीला रोखण्याची किंवा तिला प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाही. त्यांना वाटते की, तिथून शांतपणे निघणे हेच हिताचे आहे.
स्मशानभूमी ५० वर्षांपासून बंद आहे
१८४७ मध्ये बांधलेले हे स्मशान १९७२ मध्ये बंद झाले. १८०० च्या दरम्यान कॉलराच्या साथीमुळे मरण पावलेल्या लोकांचे बहुतेक मृतदेह येथे दफन करण्यात आले आहेत. या स्मशानभूमीचा वापर जवळजवळ ५० वर्षांपासून केला जात नाही, तरीही ती महिला तिथे जाणे सुरूच ठेवले आहे. स्थानिक लोक म्हणतात की, ती महिला आणि तिचे भितीदायक कृत्य पाहून त्यांना भीती वाटते. त्याने अनेक वेळा विचार केला की, त्या बाईशी बोलावे, पण धीर येऊ शकला नाही.