रेल्वेला बनवलं 'किचन'! इलेक्ट्रिक केटलीत चहा बनवत होती महिला, व्हिडीओ पाहून संतापले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:08 IST2026-02-28T13:08:11+5:302026-02-28T13:08:51+5:30
काही व्हिडीओ पाहून लोकांची स्तुती करावीशी वाटते, तर काही व्हिडीओ पाहून रागही येतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये काय दिसते.

रेल्वेला बनवलं 'किचन'! इलेक्ट्रिक केटलीत चहा बनवत होती महिला, व्हिडीओ पाहून संतापले लोक
आजच्या काळात जवळजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कुठे काही चांगली किंवा चुकीची घटना घडली की लोक लगेच त्याचा व्हिडीओ बनवतात आणि तो सोशल मीडियावर शेअर करतात. तुम्हीही सोशल मीडियावर असालच आणि तिथे दररोज अनेक व्हिडीओ पाहत असाल. काही व्हिडीओ पाहून लोकांची स्तुती करावीशी वाटते, तर काही व्हिडीओ पाहून रागही येतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये काय दिसते.
व्हिडिओमध्ये काय दिसले?
तुम्ही अनेक वेळा ट्रेनने प्रवास केला असेल. भारतीय रेल्वे प्रवाशांना त्यांच्या कोचमध्ये कोणकोणत्या सुविधा देते, हेही तुम्हाला माहिती असेल. प्रत्येक सीटजवळ मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी सॉकेट दिलेले असते.
पण तुम्ही कधी त्या सॉकेटमध्ये प्लग लावून इलेक्ट्रिक कॅटल वापरलं आहे का? बहुतेकांनी असं केलं नसेल, कारण ते त्या कामासाठी नसतं आणि तसं करणं धोकादायकही ठरू शकतं. मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला ट्रेनमध्ये चक्क इलेक्ट्रिक केटल वापरताना दिसते. कोणीतरी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Dear @RailMinIndia@RailwaySeva
— Woke Eminent (@WokePandemic) February 26, 2026
People are not aware that using electric kettle inside train can cause short circuit and can lead to an fire incident.
Please run an awareness campaign about it. pic.twitter.com/fA2CiBsmRy
हा व्हिडिओ X या प्लॅटफॉर्मवर @WokePandemic या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक केटल वापरल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका असतो.
ही बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आहे. तसेच पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने Railway Seva या अधिकृत हँडलला टॅग केले होते. त्यावरून रेल्वे सेवेकडून उत्तर देण्यात आले असून पुढील कारवाईसाठी अधिक माहिती मागवण्यात आली आहे.