अरे बापरे! प्रियकराने चिप्स खाल्ले, सनकी गर्लफ्रेंडने कारच अंगावर घातली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:21 IST2023-02-28T13:18:57+5:302023-02-28T13:21:00+5:30
कपल म्हटले की वाद-विवाद आलाच. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये कोणत्याही कारणाने विनाकारण वाद होत असतात, पण हे वाद काही वेळाने लगेच मिटतात. असाच एक वाद आता समोर आला आहे.

अरे बापरे! प्रियकराने चिप्स खाल्ले, सनकी गर्लफ्रेंडने कारच अंगावर घातली
कपल म्हटले की वाद-विवाद आलाच. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये कोणत्याही कारणाने विनाकारण वाद होत असतात, पण हे वाद काही वेळात मिटतात. असाच एक वाद आता समोर आला आहे. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा हा वाद थेट न्यायालयात पोहोचला आहे. या वादाचे कारणही तसेच भन्नाट आहे. प्रियकराने चिप्स खाल्ल्यावरुन हा वाद झाला असल्याचे कारण समोर आले आहे.
ही घटना ऑस्ट्रेलियातील अॅडलेडची आहे. येथे एका जोडप्यामध्ये कोणतीच भेटवस्तू किंवा सोन्या-चांदीवरून नव्हे, तर चीप्सवरुन भांडण झाले. तुम्हाला ऐकून थोडं विचित्र वाटेल पण असंच काहीसं घडलं जेव्हा तरुणी तिच्या बॉयफ्रेंडवर रागावली कारण त्याने तिच्या समोर ठेवलेले चीप्स खाल्ले होते.
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना! लग्नाचा Video बनवताना 'ती' पडली नाल्यात अन्...
बॉयफ्रेंडने चिप्स खाल्ले या कारणामुळे गर्लफ्रेंडला राग आला. अॅडलेड मॅजिस्ट्रेट कोर्टात मॅथ्यू फिन नावाच्या व्यक्तीने ही घटना न्यायाधीशांना सांगितली. या ४२ वर्षीय व्यक्तीने सांगितले की त्याची मैत्रीण शार्लोटने चिकन आणि सॅलडचे पॅक विकत घेतले होते. फिनने त्याला चिप्स मागितले तेव्हा ते मेलबर्न रस्त्यावरून चालत होते. तिच्याजवळ असलेले चिप्स उचलताच ती भडकली. यावेळी तिने फक्त चिप्स हिसकावून घेतल्या नाहीत तर त्याला कारमधून उतरण्यास सांगितले आणि त्याच्यावर कार चालवण्याचा प्रयत्न केला.