फोनच्या नादात 7 तास दरीमध्ये उलटी लटकून राहिली तरूणी, शर्थीच्या प्रयत्नानंतर वाचला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:49 IST2024-10-23T16:29:32+5:302024-10-23T16:49:59+5:30
12 ऑक्टोबरला हंटर व्हॅलीमध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा आपला पडलेला फोन घेण्याचा ती प्रयत्न करत होती.

फोनच्या नादात 7 तास दरीमध्ये उलटी लटकून राहिली तरूणी, शर्थीच्या प्रयत्नानंतर वाचला जीव!
मोबाइलमुळे लोकांची कामे सोपी झाली असली तरी अनेक फोनचे अनेक दुष्परिणामही बघायला मिळतात. लोक फोनवर जास्तीत जास्त वेळ घालवतात. सतत फोनवर लक्ष असल्याने लोकांचे अपघातही वाढले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. 20 वर्षीय तरूणी NSW मध्ये दोन डोंगरांच्या मधील एका दरीत पडली. तिचं डोकं खाली आणि पाय होते. याच स्थितीत तिला 7 तास रहावं लागलं. 7 न्यूजच्या रिपोर्टनुसार, 12 ऑक्टोबरला हंटर व्हॅलीमध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा आपला पडलेला फोन घेण्याचा ती प्रयत्न करत होती.
NSW अॅम्बुलन्स पॅरामेडिक्सला एका बचाव दलासोबत मिळून तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 500 किलोचा एक मोठा दगड बाजूला करावा लागला. तेव्हा कुठे तरूणीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं.
पॅरामेडिक्स कर्मचारी पीटर वाट्सने सांगितलं की, त्याच्या 10 वर्षाच्या नोकरीत त्याने अशा स्थितीचा कधीच सामना केला नव्हता. त्याने ही स्थिती फारच आव्हानात्मक असल्याचं सांगितलं.
तो म्हणाला की, 'माझ्या 10 वर्षाच्या नोकरीत मला कधीच अशा स्थितीचा सामना करावा लागला नाही'. तरूणीसोबत असलेल्या मित्रांनी आधी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. शेवटी त्यांनी मदतीसाठी फोन केला आणि बचाव दल पोहोचलं.
सात तास उलट्या स्थितीत लटकून राहिल्यानंतरही महिेलेला सामान्य खरचटलं. पण तिचा फोन मिळू शकला नाही.