Video : एकावर एक ९ जीन्स घालून दुकानातून होत होती पसार, व्हिडीओ झाला व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 16:02 IST2019-11-22T15:56:53+5:302019-11-22T16:02:21+5:30

जास्तीत जास्ती तरूणींना हे चांगलंच माहीत असेल की, स्किनी जीन्स घालणं किती अवघड काम असतं. इतकं अवघड असूनही जर एखाद्या महिलेने एकावर एक ९ जीन्स घातल्या.

Woman shoplifts 8 pairs of jeans wearing them all at once caught by security guard video goes viral | Video : एकावर एक ९ जीन्स घालून दुकानातून होत होती पसार, व्हिडीओ झाला व्हायरल...

Video : एकावर एक ९ जीन्स घालून दुकानातून होत होती पसार, व्हिडीओ झाला व्हायरल...

जास्तीत जास्ती तरूणींना हे चांगलंच माहीत असेल की, स्किनी जीन्स घालणं किती अवघड काम असतं. इतकं अवघड असूनही जर एखाद्या महिलेने एकावर एक ९ जीन्स घातल्या असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण अशी एक घटना समोर आली आहे. बरं एका महिलेने दुकानातून जीन्स चोरी करण्यासाठी हा कारनामा केलाय. पण झालं असं की, सिक्युरिटी गार्डला तिच्या संशय आला अन् ती पकडली गेली.

सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती एकावर एक ८ जीन्स घालताना दिसत आहे. शेवटी ती तिची इनरपॅंटही दाखवते, जेणेकरून तिने काही चोरी केलं नाही हे सांगता यावं. महिलेने सर्वच जीन्स काळ्या आणि निळ्या रंगाचे घातल्या. 

व्हिडीओमध्ये सिक्युरिटी गार्डचाही आवाज येतो आहे. तो जीन्सची मोजत आहे. हे स्पष्ट झालं नाही की, व्हिडीओ कुठला आहे. पण असं सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ व्हेनेझुएला येथील आहे. तसेच महिलेला अटक केली गेली का हेही समोर येऊ शकलं नाही. पण सोशल मीडियावर या महिलेचा कारनामा पाहून लोक हैराण झाले आहेत.


Web Title: Woman shoplifts 8 pairs of jeans wearing them all at once caught by security guard video goes viral