कुत्र्यासोबत करत होती लाईव्ह रिपोर्टिंग, अचानक कुत्र्याने असं काही केलं की जागीच कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:09 PM2021-09-23T13:09:01+5:302021-09-23T13:11:56+5:30

एक लाइव्ह रिपोर्टिंगचा व्हिडीओ व्हायरल (Live reporting video viral) होतो आहे. ज्यात एक रिपोर्टर कुत्र्याला घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी तिच्या कुत्र्याने तिच्यासोबत जे काही केलं ते खूप धक्कादायक होतं. 

woman reporter falls down while reporting live with doggy viral video | कुत्र्यासोबत करत होती लाईव्ह रिपोर्टिंग, अचानक कुत्र्याने असं काही केलं की जागीच कोसळली

कुत्र्यासोबत करत होती लाईव्ह रिपोर्टिंग, अचानक कुत्र्याने असं काही केलं की जागीच कोसळली

Next

अनेकदा लाइव्ह रिपोर्टिंग असे काही किस्से घडतात की प्रेक्षक शॉक होतात. सध्याच अशाच एक लाइव्ह रिपोर्टिंगचा व्हिडीओ व्हायरल (Live reporting video viral) होतो आहे. ज्यात एक रिपोर्टर कुत्र्याला घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी तिच्या कुत्र्याने तिच्यासोबत जे काही केलं ते खूप धक्कादायक होतं. 

महिला रिपोर्टर एका कुत्र्याला सोबत घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग करत होती.  सुरुवातीला बराच वेळ कुत्रा तिच्या बाजूला बसलेला होता. त्याचवेळी ती रिपोर्टर हसत हसत लाईव्ह देत होती. स्टुडिओतील अँकरशी संवाद साधताना असतानाच कुत्रा तिच्यासोबत जे काही काही करतो ते पाहून आपल्याला सुरुवातीला धक्काच बसतो.

या रिपोर्टरच्या शेजारी बसलेला कुत्रा थोड्या वेळाने तिथून पळ काढतो. तो समोर कॅमेरमनच्या दिशेने पळत जातो. पण त्याच्या गळ्यातील दोरी रिपोर्टरच्या हातात आहे. रिपोर्टर लाइव्ह देण्यात दंग आहे, त्याचवेळी कुत्रा तिला आपल्यासोब खेचतच घेऊन जातो. रिपोर्टर अक्षरशः जमिनीवर आडवीच पडते. ती स्वतःला सावरू शकत नाही. थोड्या वेळाने ती पुन्हा उठते आणि स्क्रिनसमोर येते.

व्हिडीओ पाहून जसा आपल्याला धक्का बसला तसाच अँकरलाही बसला. त्यामुळे रिपोर्टर पुन्हा स्क्रिनसमोर येताच अँकर तिला तू ठीक आहे ना, तुला दुखापत झाली नाही ना, असं विचारतो. त्यावेळी रिपोर्टर बिलकुल नाही असं उत्तर देतं. मग रिपोर्टर आणि अँकर दोघेही हसतात. कुत्र्याला कॅमेरामन जास्त आवडल्याचं दिसतं अशी प्रतिक्रियाही अँकर देतो.

गाईड डॉग युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. इथं दिलेल्या माहितीनुसार या रिपोर्टरचं नाव कॅरोल किर्कवूड (Carol Kirkwood) आहे. ती बीबीसीमध्ये वेदर रिपोर्टसाठी काम करते. एका फ्लॉवर शोसाठी ती कुत्र्यासोबत बसून लाइव्ह करत होती. यूकेतील चेलसीमधील लाईव्ह टीव्हीवर अँकरशी संवाद साधत होती. त्याचवेळी ही घटना घडली.


 

Web Title: woman reporter falls down while reporting live with doggy viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app