शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Zomato वरून मागवलेलं जेवण रद्द केलं; रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं तरुणीचं नाक फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 16:00 IST

Woman orders from Zomato and cancel the Order angry delivery boy hits punch in the face Bengaluru police complaint : कंपनीनं मागितली माफी, पोलिसांकडूनही कारवाईचं आश्वासन

ठळक मुद्दे कंपनीनं मागितली तरूणीची माफी पोलिसांकडूनही कारवाईचं आश्वासन

आजकाल अनेकदा आपण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असलो किंवा काही विशेष असेल तर बाहेरुन ऑनलाईन पर्यायांचा वापर करून जेवण मागवतो. दरम्यान, एका तरूणीनं व्यस्त असल्यामुळे Online Food Delivery ऑनलाईन फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं  Zomato होतं. परंतु, तिच्यासोबत जे झालं ते जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ऑर्डर केलेलं जेवण तरूणीपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. यानंतर त्या तरूणीनं ती ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतरही थोड्या वेळानं तो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या तरूणीच्या घरी पोहोचला. परंतु तरूणीनं ते जेवण घेण्यास नकार दिला तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयला राग अनावर झाला आणि त्यानं त्या तरूणीच्या नाकावर बुक्का मारला. त्यानंतर तिच्या नाकातून रक्तही वाहू लागलं. त्यानंतर या तिनं याचा व्हिडीओ बनवून लोकांना याबाबत माहिती दिली. हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये त्या तरूणीनं आपल्यासोबत घडलेल्या घटनेचं वर्णनही केलं आहे. आपण केलेली ऑर्डर येण्यास उशीर झाल्यामुळे कंपनीच्या कस्टमर केअरला माहिती देऊन तिनं ऑर्डर कॅन्सल केली होती. ज्यावेळी ती महिला कस्टमर केअरसोबत बोलत होती त्याचवेळी डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या ठिकाणी पोहोचला. आपण अर्धाच दरवाजा उघडला आणि जेवण घेण्यास नकार दिला. त्यावेळी डिलिव्हरी बॉयनं आपल्यासोबत वाद धावण्यास सुरूवात केली. परंतु त्यानंतर त्यानं घरात शिरून जेवण ठेवलं. ज्यावेळी त्याचा आपण विरोध केला तेव्हा त्यानं तुमचा नोकर आहे का असं विचारत आपल्या नाकावर बुक्का मारल्याचं तरूणीनं सांगितलं. 

रुग्णालयात जाऊन उपचारया प्रकारानंतर कोणीही आपली मदत केली नाही. तसंच यानंतर आपण रुग्णालयात जाऊन उपचार घेतलं. सध्या बोलण्यासारखीही आपली स्थिती नाही. बंगळुरू पोलिसांनी आपली मदत केली असून लवकरच त्या व्यक्तीला अटक करण्याचं आश्वासन दिल्याचं तरूणीनं व्हिडीओमध्ये सांगितलं. झोमॅटोकडून माफीतरूणीच्या आरोपांवर झोमॅटोकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसंच कंपनीनं महिलेची माफीदेखील मागितली आहे. दरम्यान, स्थानिक अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधणार असून पोलीस तपास किंवा अन्य वैद्यकीय सुविधा ते उपलब्ध करून देणार आहेत. इतकंच नाही तर कंपनीनं तरुणीला संबंधित व्यक्तीवर कारवाईचं आश्वासनही दिलं आहे. 
टॅग्स :ZomatoझोमॅटोBengaluruबेंगळूरPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल