Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:45 IST2025-06-13T13:44:29+5:302025-06-13T13:45:02+5:30
Bali Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढताना तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला.

Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
अनेक लोक त्यांच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी परदेशात जातात आणि तिथल्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करून माघारी येतात. सध्या सोशल मीडियावर बाली येथे फिरायला गेलेल्या एका तरुणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढताना तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला. संबंधित तरुणी मरणाच्या दारातून परतली, असे बोलणे वावगे ठरणार नाही.
केटी जॉनसन असे संबंधित तरुणीचे नाव आहे. केटी जॉनसनने बालीतील नुसा पेनिडा बेटावर तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. केटी खडकांवर सेल्फी काढत असताना अचानक मोठी लाट आली. या लाटेमुळे ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिचा कॅमेरा पाण्यात वाहून गेला. या घटनेतून केटी थोडक्यात बचावली.
केटी म्हणाली की, याआधीही येथे अनेक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिथे कोणताही इशारा फलक नाही किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात नाहीत. तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या ठिकाणी याआधीही खूप लोकांनी प्राण गमावले आहेत. मात्र, तरीही या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही किंवा इशारा फलकही नाही.