महिला पतीला पाठवत होती प्रायव्हेट व्हिडीओ, छोटी चूक पडली महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:28 IST2019-03-18T15:15:03+5:302019-03-18T15:28:12+5:30
जगभरातील लोक एकीकडे टेक्नॉलॉजीचा फायदा घेत आहेत, तर कधी कधी टेक्नॉलॉजी अडचणीचं कारण ठरत आहे. एका महिलेसोबत असंच काहीचं झालंय.

महिला पतीला पाठवत होती प्रायव्हेट व्हिडीओ, छोटी चूक पडली महागात!
(Image Credit : mirror.co.uk)
जगभरातील लोक एकीकडे टेक्नॉलॉजीचा फायदा घेत आहेत, तर कधी कधी टेक्नॉलॉजी अडचणीचं कारण ठरत आहे. एका महिलेसोबत असंच काहीचं झालंय. या महिलेसोबत असं काही झालंय की, तुम्हीही टेक्नॉलॉजीचा वापर करण्याआधी १० वेळा विचार कराल. बुल्गेरियामध्ये एक महिलेला तिचा खाजगी व्हिडीओ पतीला पाठवणे महागात पडले आहे. ही महिला तिचा नग्न व्हिडीओ पतीला पाठवत होती. पण एका छोट्याशा चुकीमुळे हा व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम झाला. आणि एकच गोंधळ उडाला.
mirror.co.uk च्या रिपोर्टनुसार, कामानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्या पतीला महिला तिचा खाजगी व्हिडीओ पाठवत होती. मात्र एका चुकीमुळे हा व्हिडीओ ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम झाला. हा व्हिडीओ महिलेच्या फेसबुकवरील जवळपास २ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. या लाजिरवाण्या गोष्टीमुळे महिलेला चांगलाच धक्का बसला असून ती कुणासमोरही जाण्यास घाबरत आहे.
या महिलेचा पती ब्रिटनमध्ये काम करतो. अशीही माहिती रिपोर्टमध्ये आहे की, या महिलेचा पती घडलेल्या प्रकारामुळे नाराज झाला आहे. आणि तो तिच्याशी बोलतही नाहीये. महिलेने याबाबत रेडिट या सोशल प्लॅटफॉर्मवर हे सगळं लिहिलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचा २० वर्षीय मुलगा शिक्षणासाठी तिच्यापासून दूर राहतो. त्यानेही फेसबुकवर हा व्हिडीओ पाहिला असून तो सुद्घा घरी येण्यास तयार नाही. तिच्या मुलाचं म्हणणं आहे की, मी माझ्या आईचा सामना करू शकणार नाही. मी कमीत कमी पाच वर्ष घरी परत जाणार नाही.