एअरपोर्टवर 'या' ठिकाणी झोपून बनवलं रील, यूजर म्हणाले - वायरस इथेही पोहोचलाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 16:11 IST2024-03-30T16:09:40+5:302024-03-30T16:11:43+5:30
कधी मार्केटमध्ये तर कधी मेट्रोमध्ये लोक व्हिडीओ बनवतात. असाच एक अजब व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

एअरपोर्टवर 'या' ठिकाणी झोपून बनवलं रील, यूजर म्हणाले - वायरस इथेही पोहोचलाय!
सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत येण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी लोक नको नको त्या गोष्टी करायला लागले आहेत. लोक इतके हरवून जातात की, आजूबाजूला काय आहे किंवा ते कुठे आहेत याचंही त्यांना भान नसतं. कधी मार्केटमध्ये तर कधी मेट्रोमध्ये लोक व्हिडीओ बनवतात. असाच एक अजब व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
रील्स बनवण्याची क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. जिथे संधी मिळेल तिथे कॅमेरा घेऊन सुरू होतात. शाळा, कॉलेज, ऑफिस, गार्डन सगळीकडे हेच चित्र आहे. जणू त्यांना रील्स बनवण्याचा आजारच झाला आहे. अनेकदा त्यांना असं करणं महागातही पडतं.
एक महिला विमानतळावर Baggage Carousel वर झोपताना दिसत आहे. ज्यात कंटेंट क्रिएट केल्यामुळे येणाऱ्या अडचणींच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे.
व्हिडीओ desimojito नावाच्या एका यूजरने एक्सवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्याने लिहिलं की, 'वायरस विमानतळावरही पोहोचला आहे'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून 2 मिलियन वेळा बघितला गेला आहे. महिलेने इथे अशा अशा गोष्टी करत आहे की, लोकांनी तिच्यावर टिका केली आहे.
एका यूजरने कमेंट केली आहे की, 'हा विमानतळाच्या सगळ्यात खतरनाक भागांपैकी एक आहे आणि ती तिथे झोपली आहे. तिच्यावर दंडात्मक कारवाई करून लाखो रूपये दंड लावा'. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हे काय आहे? कमीत कमी विमानतळाला तर सोडून द्या'.