आता याला काय म्हणावं? वडिलांच्या पार्थिवाजवळ मुलीचं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर होतेय ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 11:49 IST2021-10-26T11:47:54+5:302021-10-26T11:49:32+5:30

महिलेनं चक्क स्वत:च्याच वडिलांच्या पार्थिवासमोर उभं राहून ग्लॅमरस पोझ देत फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो रेडिटवर अपलोड केले आहेत.

woman hot photoshoot in front of father dead body funeral people said its shameful | आता याला काय म्हणावं? वडिलांच्या पार्थिवाजवळ मुलीचं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर होतेय ट्रोल 

आता याला काय म्हणावं? वडिलांच्या पार्थिवाजवळ मुलीचं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर होतेय ट्रोल 

सोशल मीडियातील (Social Media) रेडिट (Reddit) या नेटवर्किंग साइटवर एका अमेरिकी महिलेचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. महिलेनं चक्क स्वत:च्याच वडिलांच्या पार्थिवासमोर उभं राहून ग्लॅमरस पोझ देत फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो रेडिटवर अपलोड केले आहेत. महिलाच्या या कृतीचा युझर्सकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात असून तिला ट्रोल केलं जात आहे. 

एका अमेरिकन महिलेचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. तिनं आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या पार्थिवाजवळ उभं राहून ग्लॅमरस पोझ देत फोटो काढले. फोटोत महिलेच्या मागे तिच्या वडिलांचं पार्थिव देखील दिसत आहे. तर महिलेनं काळ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान करुन ग्लॅमरस पोझ देत फोटोशूट केलं आहे. संबंधित महिलेनं हे फोटो इन्स्टाग्राम आणि रेडिटवरील एका ग्रूपवर शेअर केले. त्यानंतर महिलेला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. एकानं तर हा तर निर्लज्जपणाचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तर एकानं असभ्यपणाचं वर्तन असल्याचं म्हणत महिलेच्या कृतीचा निषेध केला आहे. दरम्यान, या महिलेनं असं का केलं याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण युझर्सनं तिला चांगलंच सुनावलं आहे. 

Read in English

Web Title: woman hot photoshoot in front of father dead body funeral people said its shameful