मर्दानी! तलावात शिरून हाताने मगरीला भरवलं जेवण, महिलेचा खतरनाक व्हिडीओ व्हायरल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:09 IST2024-08-27T13:08:09+5:302024-08-27T13:09:17+5:30
Viral Video : एका महिलेचा मगरीसोबत एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून लोक अवाक् झाले आहेत.

मर्दानी! तलावात शिरून हाताने मगरीला भरवलं जेवण, महिलेचा खतरनाक व्हिडीओ व्हायरल....
Viral Video : मगर म्हटलं की, अनेकांना घाम फुटतो. कारण हा जीव फारच खतरनाक मानला जातो. त्यामुळे ज्या मगरी पिंजऱ्यात असतात त्यांना पिंजऱ्याच्या बाहेरूनच जेवायला दिलं जातं. कारण मगर कधी हल्ला करेल आणि खेचून पाण्यात नेईल काहीच भरोसा नसतो. पण एका महिलेचा मगरीसोबत एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून लोक अवाक् झाले आहेत.
बेलोविंग एकर्स एलीगेटर सॅंक्चुअरीची मालक गॅबीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मगरींना अजिबात न घाबरण्यासाठी ओळखली जाणारी गॅबी या व्हिडिओत बेला नावाच्या एका विशाल मगरीसोबत एका तलावात दिसत आहे. ती हाती केवळ एक छडी घेऊन मगरीला जेवण देत आहे.
गॅबी बेला मगरीला शांत करताना दिसत आहे. जेणेकरून तिने जेवण देत असताना हल्ला करू नये. गॅबी पाण्यात जाताच बेला मगर तिच्याजवळ येते आणि गॅबी तिला छडीने कंट्रोल करते. मग ती मगरीला जेवण देण्यासाठी पुढे जाते.
व्हिडिओच्या कॅप्शनला तिने लिहिलं की, 'बेला मगरसोबत काम करत आहे. बेला फार आक्रामक आहे. मात्र, जेवण देऊन आम्ही तिला शांत करत आहोत. @gatorboys_chris मला छडीचा वापर करण्याबाबत खूपकाही शिकवत आहे. कधीही जंगलात मगरींसोबत स्वीमिंग करू नका आणि त्यांना जेवण देऊ नका. हा व्हिडीओ आमच्या सॅंक्चुरीमध्ये शूट करण्यात आला आहे'.
लोक व्हिडिओवर कमेंट्स करून गॅबीचं कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं की, 'खूप छान गॅबी! हेही बघूनही बरं वाटलं की, क्रिसशिवाय दुसऱ्या कुणाला मगरीला जेवण देताना किंवा स्वीमिंग करताना कसं वाटतं. हे तर खरं आहे की, अशाप्रकारे वेगाने या गोष्टी शिकण्यासाठी खूप वर्ष लागतात. शानदार..!'.