सरकारी नोकरी हे एक असं क्षेत्र जे मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. वेळेनुसार मिळणारं प्रमोशन आणि सुरक्षितता यामुळे बहुतांश लोक सरकारी विभागांकडे धाव घेतात. पण काही लोक असेही आहेत जे या सरकारी नोकरीला कंटाळले आहेत आणि आता पश्चाताप करत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या सरकारी नोकरीला इतकी कंटाळली आहे की, तिला विविध आजारांनी ग्रासलं आहे. आता तिने व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून दुसरं उत्पन्नाचे साधन सुरू व्हावं आणि सर्व काही ठीक व्हावं.
सरकारी नोकरीला कंटाळलेली महिला म्हणाली, आजारांनी घेरलं आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिल्पा नावाची महिला बँकर असल्याचं सांगते. शिल्पाचं म्हणणं आहे की, ती गेल्या ८ वर्षांपासून सरकारी नोकरी करत आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी नोकरी सुरू केली होती आणि आज ती २९ वर्षांची झाली आहे. मात्र या नोकरीमुळे तिला अनेक आजारांनी घेरलं आहे. महिला म्हणते की, या वयात मला 'सर्व्हायकल'चा त्रास सुरू झाला आहे, मी 'मायग्रेन'ने त्रस्त आहे. इतकंच नाही तर माझ्या उजव्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली असून मला ब्लॅक स्पॉट दिसू लागले आहेत.
नोकरीला कंटाळून ही महिला म्हणते की, "जिथे २९ व्या वर्षी मुली तरुण असतात आणि स्वतःची प्रगती करतात, तिथे मी या वयात म्हातारी झाले आहे. आता मी 'कंटेंट क्रिएशन' (व्हिडिओ बनवणे) सुरू केलं आहे आणि मला आशा आहे की, सर्व काही चांगलं होईल. आता माझं कशातच मन रमत नाही." हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
हा व्हिडिओ thinkwithshilpa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, "जर इतकी त्रासलेली आहेस तर राजीनामा देऊन टाक." दुसऱ्या एकाने लिहिले, "सरकारी नोकरी खूप कष्टाने मिळते, तिला वाईट म्हणू नकोस." तर तिसऱ्या एका युजरने उपरोधिकपणे म्हटले की, "ताई, तुला कंटेंटची नाही तर डॉक्टरांची गरज आहे."
Web Summary : A 29-year-old woman in a viral video expresses regret over her government job. Citing health issues like cervical pain and migraines, she started content creation for an alternative income. Users react with mixed opinions, some advising resignation, others defending government jobs.
Web Summary : एक वायरल वीडियो में 29 वर्षीय महिला ने सरकारी नौकरी पर पछतावा जताया। सर्वाइकल दर्द और माइग्रेन जैसी स्वास्थ्य समस्याओं का हवाला देते हुए, उसने वैकल्पिक आय के लिए कंटेंट बनाना शुरू कर दिया। यूजर्स ने मिली-जुली प्रतिक्रिया दी, कुछ ने इस्तीफे की सलाह दी, अन्य ने सरकारी नौकरियों का बचाव किया।