महिलेला बेडखाली जाणवली हालचाल, पाहिलं तर एक-दोन नव्हे, तर तब्बल १८ साप; वाचा पुढे काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 19:34 IST2021-07-15T19:32:22+5:302021-07-15T19:34:03+5:30
साप असं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. मग विचार करा जिथं तुम्ही छान आराम करता अशा तुमच्या बेडखाली साप आढळला तर? तेही एक-दोन नव्हे, तर १८ साप असतील तर?

महिलेला बेडखाली जाणवली हालचाल, पाहिलं तर एक-दोन नव्हे, तर तब्बल १८ साप; वाचा पुढे काय घडलं
साप असं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. मग विचार करा जिथं तुम्ही छान आराम करता अशा तुमच्या बेडखाली साप आढळला तर? तेही एक-दोन नव्हे, तर १८ साप असतील तर? हो, हे खरं आहे. अमेरिकेच्या जॉर्जियात ही घटना घडली आहे. एका महिलेच्या घरात बेडखाली चक्क १८ साप आढळून आले आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती ट्रिश विल्चर या महिलेनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन दिली आहे. सोबत काही फोटो देखील शेअर केले आहेत. ( Woman finds 18 snakes under her bed posts photos on facebook)
इतके सारे साप पाहून खूप घाबरुन गेले. मी आणि माझ्या पतीनं याची माहिती घेतली तर लक्षात आलं की एक-दोन नव्हे तर १८ साप होते. यात १७ लहान पिल्लं होती तर एक मादी होती. घराजवळच्या एका जागेची साफसफाई झाल्यानंतर हे साप घरात आल्याची शक्यता ट्रिश यांनी वर्तवली आहे. या घटनेनंतर झोप उडाल्याचंही ट्रिश यांनी म्हटलं आहे.
ट्रिशचे पती मॅक्स यांनी काळजीपूर्वक सर्व सापांची सुखरुप सुटका केली आणि घरापासून दूर नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडण्यात आलं. घरात आणखी कुठे साप तर नाहीत ना याची तपासणी करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी सर्पमित्रालाही बोलावलं होतं. घराचा कानाकोपरा तपासून पाहिला. घरात साप नाहीत हे लक्षात आल्यानंतर ट्रिश यांचा जीव भांड्यात पडला.