बोंबला! सिंहासोबत एकाच ताटात जेवण करताना दिसली तरूणी, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:27 IST2023-07-19T16:26:53+5:302023-07-19T16:27:59+5:30
Viral Video : तुम्ही एका तरूणीला आणि सिंहाला एका ताटात जेवताना पाहिलंय का? उत्तर नाहीच असेल. पण असा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

बोंबला! सिंहासोबत एकाच ताटात जेवण करताना दिसली तरूणी, व्हिडीओ व्हायरल
Woman Eating With Lion: सोशल मीडियावर नेहमीच अजब अजब घटनांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच बघायला मिळत असतात. काही खाण्याचे व्हिडीओ असतात तर काही हसवणारे व्हिडीओ असतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय जो हैराण करणारा आहे. तुम्ही दोन मित्राना किंवा दोन भावांना एका ताटात जेवताना पाहिलं असेल, पण तुम्ही एका तरूणीला आणि सिंहाला एका ताटात जेवताना पाहिलंय का? उत्तर नाहीच असेल. पण असा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्हिडिओत एक तरूणी आणि एक सिंह एकाच ताटात जेवण करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरूणी सिंहाच्या ताटात जेवत आहे. तेही जे सिंह खात आहे. सिंह मांस खात आहे तरूणीही त्यातीलच खात आहे. हा व्हिडीओ संयुक्त अरब अमीरातच्या वाइल्डलाईफ पार्क रास अल खियामामध्ये शूट करण्यात आला होता.
या व्हिडिओला 3.8 मिलियनपेक्षा जास्त वेळा बघण्यात आलं आहे आणि शेकडो कमेंट्स यावर आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अर्थातच लोक हैराण झाले आहेत. काही लोकांनी यावर टिकाही केली आहे. तर अनेकांनी अवाक् झाल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.