VIDEO : समुद्रात परफॉर्म करत होती तरूणी, अचानक आला मोठा मासा आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:07 IST2025-01-30T13:01:39+5:302025-01-30T13:07:43+5:30
Viral Video : ही महिला जलपरीचा ड्रेस घालून अॅक्वेरिअममध्ये डान्स करत होती. तेव्हाच अचानक एका मोठ्या मास्यानं तिच्यावर हल्ला केला.

VIDEO : समुद्रात परफॉर्म करत होती तरूणी, अचानक आला मोठा मासा आणि मग....
Giant Fish Tried To Eat Mermaid Video: जलपरीच्या ड्रेस परफॉर्म करत असलेल्या एका रशियन तरूणीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला जलपरीचा ड्रेस घालून अॅक्वेरिअममध्ये डान्स करत होती. तेव्हाच अचानक एका मोठ्या मास्यानं तिच्यावर हल्ला केला. जे बघून तिथे उपस्थित लोक हैराण झाले. सुदैवानं तरूणीला फार काही होत नाही.
Ladbible वेबसाईटनुसार, २२ वर्षीय रशियन जलपरी अॅनिमेटर चीनच्या जिशुआंगबन्नामध्ये अॅक्वेरिअमच्या आत परफॉर्म करत होती. तिथे अनेक प्रेक्षकही उपस्थित होते. तरूणी परफॉर्म करत असताना अचानक एक मोठा मासा तिथे आला आणि तिच्या हल्ला केला. तरूणी घाबरली, पण तिने हिंमत दाखवत आपलं डोकं मास्याच्या तोंडातून सोडवलं. साधारण ६ सेकंदाची ही क्लीप इथेच संपते. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला. यूजर्सनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, जिशुआंगबन्ना प्रिमिटिव फॉरेस्ट पार्कवर ही घटना लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
Instagram वर ही रील @meerkat.mediaa नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ कोटी १९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाखांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. पोस्टवर आतापर्यंत ६ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत.