BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 16:01 IST2024-10-27T16:00:26+5:302024-10-27T16:01:07+5:30

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

woman came in BMW car and stole flower pot; caught on camera | BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद


नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडामतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात मध्यरात्री आलिशान BMW कारमधून आलेल्या महिलेने एका दुकानाबाहेर ठेवलेले फ्लॉवर पॉट चोरुन नेल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, फ्लॉवर पॉट चोरणाऱ्या महिलेला काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्यांना उलटे उत्तर देऊन निघून गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नोएडाच्या सेक्टर 18 मध्ये घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला फ्लॉवर पॉट चोरताना स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी काही लोक तिच्या कारजवळ येऊन तिला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, ती बाई 'मी रोज एक फ्लॉवर पॉट चोरुन नेईन,' असे उत्तर देऊन निघून जाते. तिचे उत्तर ऐकून ते लोकही आश्चर्यचकित होतात.

या महिलेने आतापर्यंत दोन फुलांच्या कुंड्या चोरल्याचीही माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या घटनेबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. 

Web Title: woman came in BMW car and stole flower pot; caught on camera