Bliss Screen Saver : साल २००० किंवा त्यानंतरच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरील हिरवळ दाखवणारा वॉलपेपर तुम्हाला नक्कीच आठवत असेल. निळं आकाश, पांढरे ढग आणि हिरवंगार गवत डोळ्यांनी आराम देणारं होतं. आजही हा नजारा अनेकांना मनात घर करून असेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या Whidows XP ऑपरेटिंग सिस्टीमध्ये कॉम्प्युटर ऑन करताच हा वॉलपेपर डोळ्यांना आराम देत होता. हे ठिकाण कुठे असेल? असा प्रश्न अर्थातच अनेकांच्या मनात आला असेल.
अनेकांना तर असंही वाटत होतं की, हा क्रीएट केलेला फोटो असेल. पण मुळात हा नजारा प्रत्यक्षात आहे. सोबतच हा नजारा आज कसा दिसतो हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. २५ वर्षानंतर हे ठिकाण कसं दिसतं हे बघून तुम्हीही अवाक् व्हाल. इन्स्टाग्राम अकाउंट @insidehistory वर अलिकडेच याबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे.
Windos XP चा डिफॉल्ट वॉलपेपर 'Bliss' आजही अनेकांना आठवतो. पीसी वर्ल्डनुसार, २००१ मध्ये मायक्रोसॉफ्टनं Windos XP लॉन्च केलं होतं. तेव्हा या वॉलपेपरनं सगळ्यांचं लक्षं वेधलं होतं.
या लोकप्रिय वॉलपेपरचा फोटो १९९६ मध्ये फोटोग्राफर चार्ल्स ओ' रिअर यांनी कॅलिफोर्नियाच्या सोनोमा काउंटीमध्ये कॅमेरात कैद केला होता. त्यानी हा नजारा हायवे १२ जवळ पाहिला होता. पावसामुळे गवत हिरवंगार झालं होतं. त्यावेळी चार्ल्स नॅशनल जिओग्राफीमध्ये काम करत होते आणि २५ वर्षांचे होते.
चार्ल्स अशा काही निवडक फोटोग्राफर्सपैकी एक होते, ज्यांनी आपला हा फोटो डिजिटल लायसेंसिंगसाठी कॉर्बिक नावाच्या सेवेवर अपलोड केला होता. महत्वाची बाब म्हणजे कॉर्बिसचे मालक मायक्रोसॉफ्टचे तेव्हाचे सीईओ बिल गेट्स होते. मायक्रोसॉफ्टला हाच फोटो आवडला आणि त्यांनी खरेदी केला.