वजन करण्याच्या मशीननं झाली पतीच्या अफेअरची पोलखोल, महिलेने पोस्टमधून सांगितली कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:52 IST2025-07-31T16:51:22+5:302025-07-31T16:52:38+5:30
Husband affair caught : काही महिला तर पतीला रंगेहाथ पकडतात. पण एका महिलेने आपल्या पतीचं अफेअर वेगळ्याच प्रकारे उघड केलं.

वजन करण्याच्या मशीननं झाली पतीच्या अफेअरची पोलखोल, महिलेने पोस्टमधून सांगितली कहाणी
Husband affair caught : पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. जोपर्यंत विश्वास कायम आहे तोपर्यंत या नात्यात दरी निर्माण होत नाही. पण जेव्हा एक पार्टनर दुसऱ्याला दगा देत असेल तर दुसऱ्यानं सावध व्हायला हवं. अनेक अशा घटना समोर येत असतात, ज्यात महिलांनी आपल्या पतीच्या अफेअरची पोलखोल केलेली असते. काही महिला तर पतीला रंगेहाथ पकडतात. पण एका महिलेने आपल्या पतीचं अफेअर वेगळ्याच प्रकारे उघड केलं. आता दोघेही वेगळे राहू लागते आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण दरम्यान महिलेच्या मनात विचार आला घटस्फोट पुढे ढकलावा की नाही. पण तेव्हाच तिला पतीची एक हैराण करणारी बाब समजली. ज्यामुळे तिचा विश्वास पूर्णपणे उडाला. महिलेने पतीच्या घरातील डिजिटल वेट मशीनचा डेटा चेक केला आणि तिला फारच विचित्र असं काही आढळलं.
या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, टेक्नॉलॉजीमुळे आपलं जीवन तर सोपं झालंच आहे, सोबतच नात्यांचं सत्यही समोर येत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या महिलेने आपल्या पतीच्या दग्याचा छडा एका डिजिटल वेट मशीनच्या माध्यमातून लावला. रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिने एक फोटो शेअर करत सांगितलं की, ती पतीपासून वेगळी राहत होती. पण दोघांनी ठरवलं होतं की, यादरम्यान ते दुसऱ्या कुणाशी संबंध ठेवणार नाहीत. तेव्हाच असं काही समोर आलं की, तिचा संशय आणखीन वाढला.
महिलेने लिहिलं की, "मी एक दिवस सहज आमची डिजिटल वेट मशीनची मेमरी चेक करत होते आणि त्यात आढळून आलं की, त्या दिवशी रात्री उशीरा 12:25 आणि 12:26 वाजता दोन वेगवेगळे वजन नोंदवले गेले. दोन्ही वजन 120 पाउंड (जवळपास 54.5 किलो). पण त्या दिवशी मी तिथे नव्हती. घरी फक्त माझा पती होता".
पतीचं पितळ उघडं पडलं
महिलेने असंही सांगितलं की, ती स्वत: 120 पाउंडची नाहीये आणि वजन मोजण्याची ही वेळ फारच संशयास्पद होती. या माहितीमुळे तिला संशय आला की, एखाद्या दुसऱ्या महिलेने त्यावेळी घरात वजन केलं असेल. हा हा तिच्या पतीच्या दग्याचा ठोस पुरावा आहे. महिलेने लिहिलं की, तिचं आणि पतीचं नातं आधीपासून तणावाचं होतं. पतीच्या आधीच्या अफेअरनंतरही दोघे एकमेकांना वेळ देत होते. पण या वजनाच्या मेमरीनं वेगळं चित्र समोर आणलं.
लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
एका व्यक्तीनं महिलेला सल्ला दिला की, "त्याला सांगू नको की, तुला हे कळलंय, गपचूप वकिलासोबत बोल आणि पुढचा विचार कर". दुसऱ्यानं लिहिलं की, "हे दोन बॅक टू बॅक वजन आहेत, अर्थ स्पष्ट आहे की, तो आता दुसऱ्या महिलांना भेटत आहे. आता हे नातं संपव". अनेक लोकांनी महिलेच्या डिजिटल गुप्तहेरीचं कौतुक केलं आहे.