Viral Video : झूम मिटींग सुरू असतानाच पत्नी किस करायला आली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 15:45 IST2021-02-17T15:43:12+5:302021-02-17T15:45:48+5:30
Viral Video : व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय भन्नाट व्हायरल, आयपीएस अधिकाऱ्यानंही शेअर केला हा मजेशीर व्हिडीओ

Viral Video : झूम मिटींग सुरू असतानाच पत्नी किस करायला आली आणि...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अनेक कार्यालये सुरू झालेली नाहीत. अनेक कर्मचारी सध्याही घरूनच काम करत आहेत. अशातच काही मीटिंग वगैरे असतील तर त्या अॅप्सच्या सहाय्यानं घेण्यात येतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवऱ्याची झूम मीटिंग सुरू असतानाच त्याची पत्नी मध्ये येऊन त्याचा किस घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्याला वर्क फ्रॉम होम असा हॅशटॅगही दिलाय. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्याला हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
#Perils of #WorkFromHome#WFH
— Rupin Sharma IPS (@rupin1992) February 13, 2021
As received on whatsapp. pic.twitter.com/dVpQ7CSTJf
रुपीन शर्मा यांनी १६ फेब्रुवारी रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे अनेकदा घरूनच अॅपद्वारे मीटिंग बोलावण्यात येतात. यापूर्वीही झूमवर सुरू असलेल्या मीटिंगदरम्यान घडलेल्या घटना व्हायरल झाल्या होत्या.