पाणी भरुन प्लास्टिक पिशवी घरात टांगली तर खरंच डास आणि माश्या घरात येत नाही? पाहा खरंखुरं उत्तर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:27 IST2025-10-15T13:02:33+5:302025-10-15T17:27:12+5:30
Water bag in balcony : सोशल मीडियावर काही फोटोत किंवा व्हिडिओत लोक बाल्कनीमध्ये पिशवीत पाणी टांगून ठेवताना दिसतात. पण याचं कारण काय?

पाणी भरुन प्लास्टिक पिशवी घरात टांगली तर खरंच डास आणि माश्या घरात येत नाही? पाहा खरंखुरं उत्तर..
Water bag in balcony : बदलत्या हवामानात तब्येत बिघडण्याची शक्यता अधिक असते. या काळात अनेक आजारांचा धोका वाढतो. कारण, हवामान बदलताना तापमान आणि आर्द्रतेत बदल होतो, ज्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया वाढतात. आपल्या शरीराला या बदलाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि त्यामुळे आपण पटकन आजारी पडतो.
लोक पाण्याची पिशवी का टांगत आहेत?
हवामान बदलताच मच्छरांची संख्या वाढते. मच्छर वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच मच्छरांना घरात येण्यापासून थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. अलीकडे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात लोक घराच्या बाल्कनीत पाण्याने भरलेली प्लास्टिकची पिशवी टांगत आहेत.
काय करावं?
एक पारदर्शक प्लास्टिक पिशवी घ्या. त्यात अर्धी पिशवीभर स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात अॅल्युमिनियम फॉइलचा एक छोटा गोळा टाका. आता ही पिशवी खिडकी किंवा बाल्कनीत टांगून ठेवा.
आरोग्य टिकवण्यासाठीचा हा सोपा उपाय?
हा उपाय केल्यानं घरातील मच्छर आणि माशा कमी होऊ शकतात. त्यामुळे मलेरिया किंवा इतर मच्छरजन्य आजारांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं. याचबरोबर, माशा अन्नावर बसल्यास गट हेल्थ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनाही दूर ठेवणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
हा उपाय खरंच काम करतो का?
सोशल मीडियावर सांगितल्याप्रमाणे, पाणी आणि अॅल्युमिनियम फॉइलच्या रिफ्लेक्शनमुळे डास आणि माशा दूर राहतात, असा दावा केला जातो. मात्र काही वापरकर्त्यांनी सांगितलं आहे की, त्यांना या उपायाने फारसा फरक जाणवला नाही. त्यामुळे हा उपाय पूर्णतः शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध नाही, पण नैसर्गिक आणि हानीकारक नसल्यामुळे वापरून पाहणं हरकत नाही.