Viral Video: परदेशात गेलेले भारतीय मायदेशी का परतत नाहीत? व्हायरल व्हिडीओमुळं नेटकऱ्यांमध्ये जुंपली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:21 IST2025-12-11T11:19:03+5:302025-12-11T11:21:16+5:30
Viral News: एकदा परदेशात स्थायिक झालेले भारतीय मायदेशी परतण्यास का कचरतात? याचे उत्तर एका कंटेंट क्रिएटरने व्हिडीओच्या माध्यमातून दिले.

Viral Video: परदेशात गेलेले भारतीय मायदेशी का परतत नाहीत? व्हायरल व्हिडीओमुळं नेटकऱ्यांमध्ये जुंपली!
भारतातील लाखो तरुण अमेरिकेत, कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियात जाण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, एकदा परदेशात स्थायिक झालेले भारतीय मायदेशी परतण्यास का कचरतात? याचे उत्तर एका कंटेंट क्रिएटरने व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे. मात्र, या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेटकरी दोन गटात विभागले केले असून त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
कंटेंट क्रिएटर सारिका यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, परदेशात गेलेल्या भारतीयांना भारतात परतणे किती कठीण आहे, याची सोप्या आणि व्यावहारिक भाषेत मांडणी करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.
उत्पन्नातील फरक
सारिका म्हणाल्या की, "भारतात एक नवीन पदवीधर दरमहा ₹२५,००० ते ₹४०,००० कमवतो. तर, अमेरिकेत उबर चालवल्यास दरमहा ₹२,१०,००० ते ₹२,५०,००० सहज मिळू शकतात. शिवाय, भारतात लोकांना घर खरेदी करण्यासाठी १५ वर्षे लागतात. तर, अमेरिकेत हे स्वप्न केवळ चार ते पाच वर्षांत पूर्ण होऊ शकते. अमेरिकेतून भारतात ५०० रुपये पाठवल्यास त्याची किंमत जवळपास ४१ हजार ५०० रुपये इतकी होते, यात मुलांच्या शाळेची फी भरणे, औषधे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची सहज खरेदी केली जाऊ शकते. तर भारतात ₹४०,००० कमावणारी व्यक्ती घरखर्चासाठी संघर्ष करते."
महत्त्वाचा सल्ला
व्हिडिओच्या शेवटी सारिकाने स्पष्ट केले की, त्यांचे वक्तव्य भारताचा द्वेष करण्यासाठी नसून व्यावहारिक ज्ञान आहे. भारतीयांनी अमेरिकासारख्या देशांमध्ये पाच ते सात वर्षे जावे, पैसा कमवावे, शिकावे आणि जर वाटत असेल तर पुन्हा भारतात यावे, असाही त्यांनी सल्ला दिला.
इंटरनेटवर दोन गटांत शाब्दिक युद्ध
व्हिडिओ व्हायरल होताच, इंटरनेट वापरकर्ते दोन गटांमध्ये विभागले गेले. अनेक लोकांनी सारिका यांचे समर्थन केले. पगारातील तफावत आणि सुविधांच्या अभावामुळेच लोक परत येत नाहीत, हे कटू सत्य असल्याचे त्यांनी म्हटले. तर, दुसऱ्या गटाने कुटुंबाचे महत्त्व आणि शाच्या मातीचा सुगंध यांसारख्या भावना कोणत्याही उत्पन्नापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत, असे म्हटले आहे.