सोफी रेन: 21 वर्षांची कोट्याधीश कंटेंट क्रिएटर, जिने 680 कोटी रुपये सोडून स्वीकारलं साधं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:04 IST2025-10-10T15:03:34+5:302025-10-10T15:04:37+5:30
Social Viral : वयाच्या केवळ 21 व्या सोफी त्या टॉप कंटेंट क्रिएटर्समधील आहे ज्यांनी OnlyFans मधून तब्बल 680 कोटी कमाई केली. पण नंतर सोफीनं इतके पैसे असूनही मार्ग निवडला.

सोफी रेन: 21 वर्षांची कोट्याधीश कंटेंट क्रिएटर, जिने 680 कोटी रुपये सोडून स्वीकारलं साधं जीवन
Social Viral : जगभरातील वेगवेगळ्या कंटेंट क्रिएटर्सची नेहमीच काही कारणांनी चर्चा होत असते. काही तरूणी आपल्या हॉटनेसमुळे, विचित्र कंटेंटमुळे किंवा वादग्रस्त कंटेंटमुळे चर्चेत असतात. पण सध्या जगातील टॉप कंटेंट क्रिएटर्सपैकी एक सोफी रेनची चर्चा रंगली आहे. ती सुद्धा चांगल्या कारणासाठी. वयाच्या केवळ 21 व्या सोफी त्या टॉप कंटेंट क्रिएटर्समध्ये आली ज्यांनी OnlyFans मधून तब्बल 680 कोटी रूपये कमाई केली. पण नंतर सोफीनं इतके पैसे असूनही मार्ग निवडला. तिने मियामीच्या बॉप हाऊससारख्या लग्झरी ठिकाणी राहणे सोडून 20 एकरांच्या फार्महाऊसला आपले नवीन घर बनवले.
आता सोफी गाई, मेंढ्या, कोंबड्या आणि मासे यांची काळजी घेत आहेत. सोफीचं मत आहे की, ही लाइफस्टाईल तिला अधिक खरी वाटते आणि शांतता देते. ती सांगते, “लोकांना वाटते की श्रीमंत झाल्यावर माणूस जग फिरायला इच्छितो, पण मला तर गाईंना खायला देताना जास्त आनंद होतो.”
सोफीने आपल्या 81 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्ससोबत आपल्या नवीन लाइफस्टाईलच्या काही गोष्टी शेअर केल्या. तिनं अलिकडेच दोन मेंढीच्या पिल्लांची ओळख करून दिली. या मेंढ्यांचे नावं तिनं 'किम कार्दशियन' आणि 'कान्ये वेस्ट' ठेवले आहे. फार्ममध्ये तिच्याकडे सहा गाई आहेत, ज्यापैकी दोन गाई तिनं टॅम्पा (फ्लोरिडा) येथून रेस्क्यू केल्या होत्या; त्यांची नावे आहेत “मिल्कशेक” आणि “पॅनकेक.”
कसा घडला इतका बदल?
सोफी सांगते की, तिचं आयुष्य तिला बनावट, दिखावा करणारं वाटत होतं. आता जेव्हा ती मातीमध्ये काम करते, प्राण्यांना खायला देते, तेव्हा तिला आत्मशांती आणि संतुलन अनुभवायला मिळतं. ती सांगते की, 'फार्म लाइफ मला ग्राउंडेड ठेवते, आता मला खरा आनंद मिळतो'.
₹680 कोटी कमावूनही सोफी आता मानते की पैसा आनंद खरेदी करू शकत नाही. ती सांगते की, “मी सर्वात जास्त आनंदी असते जेव्हा माझ्या बूट मातीने माखलेले असतात आणि मी जुनी टी-शर्ट घालून प्राण्यांसोबत असते. महागडे हँडबॅग्स आता मला उत्साहित करत नाहीत.”