ट्रेनमध्ये कोण-कोण घेतं चहा? मग हा VIDEO नक्कीच पाहा...! कुठे धुतली जातायत भांडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:10 IST2025-01-24T16:09:25+5:302025-01-24T16:10:08+5:30
हा व्हिडिओ पाहून कुठल्याही रेल्वे प्रवाशाला धक्का बसेल...

ट्रेनमध्ये कोण-कोण घेतं चहा? मग हा VIDEO नक्कीच पाहा...! कुठे धुतली जातायत भांडी?
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासावर निघताना काही प्रवासी अथवा लोक घरूनच खाण्या-पिण्याचे साहित्य आपल्या सोबत घेऊन जातात. तर काही प्रवासी ट्रेनमध्ये फिरणाऱ्या विक्रेत्यांवर अवलंबून असतात. यातील काही विक्रेते, ज्यांना प्रवाशांचे आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छतेशी काहीही देणे-घेणे नसते, ते या प्रवाशांची फसणूक करतात, विश्वास घात करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कुठल्याही रेल्वे प्रवाशाला धक्का बसेल.
yt_ayubvlogger23 नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अक्षरशः शौचालयात बसून चहाची केटली (थरमास) धुताना दिसत आहे. संबंधित शौचालय ट्रेनमधील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शौचालयाच्या जेट स्प्रेने केटली धुताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना युजरने 'ट्रेन टी', असे लिहिले आहे.
हा व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी व्यक्त केला संताप -
हा व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स संताप व्यक्त करत आहेत. एकाने म्हटले आहे, 'नशीबवान आहे, एकदाही ट्रेनचा चहा घेतला नाही'. एकाने लिहिले, 'ट्रेन की चाय, दीमाग खुल जाऐ', आणखी एकाने लिहिले, 'आता चहा घेणार नाही' आणखी एकाने लिहिले, 'हे अत्यंत वाईट आहे'. अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.
महत्वाचे म्हणजे, ही घटना कुठल्या रेल्वे स्टेशनवरील, अथवा ट्रेनमधील आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याशिवाय हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? हेही स्पष्ट झालेले नाही. यामुळे लोकमत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.