VIDEO : आई-वडील करत होते लग्न, त्यांच्या मुलीने मधेच जे केलं ते पाहून सगळे झाले हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 15:35 IST2021-03-20T15:33:51+5:302021-03-20T15:35:50+5:30
Sara Wickman ही एक मेकअप एक्सपर्ट आहे. ती यूएसला राहते. तिने मार्चमध्येच आपल्या पार्टनरसोबत लग्न केलं. याचे दोन व्हिडीओ तिने शेअर केले आहेत.

VIDEO : आई-वडील करत होते लग्न, त्यांच्या मुलीने मधेच जे केलं ते पाहून सगळे झाले हैराण!
ही घटना आहे अमेरिकेतील. इथे एका चिमुकलीने तिच्या आई-वडिलांच्या लग्नात जे केलं ते पाहून सगळेच हैराण झाले. तसाही लहान मुला-मुलींना कशाचा काहीही फरक पडत नाही. त्यांना जे करायचं असतं ते करून राहतात. मात्र, आपल्या आईच्या कडेवर जाण्यासाठी या मुलीने जे केलं ते बघून तुम्हाला हसू येईल.
Sara Wickman ही एक मेकअप एक्सपर्ट आहे. ती यूएसला राहते. तिने मार्चमध्येच आपल्या पार्टनरसोबत लग्न केलं. याचे दोन व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. यातील तिच्या एली नावाच्या मुलीने सर्वांची मनं जिंकली आहेत. एलीने आपल्या आईचं लक्ष वेधण्यासाठी नको नको ते केलं. आधी तर तर ती जमिनीवर पडली, तिथेच झोपून राहिली. सर्वांचं लक्ष एलीवर गेलं.
या व्हिडीओत तर लग्न सुरू असताना एली तिच्या आईच्या कडेवर आहे. रिंग घालण्याची जशी वेळ आली. तशी रिंग हरवली. मग सारा जोरात हसू लागली. कारण तिने याची अजिबात कल्पना केली नव्हती. तर एली रागात बघत आहे. साराच्या लग्नाचे हे व्हिडीओ लोकांना फारच आवडले. लोकांनी तिच्या लहान मुलीचंही कौतुक केलंय.