कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? विद्यार्थ्याचे उत्तर वाचून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:27 IST2025-04-05T17:24:15+5:302025-04-05T17:27:25+5:30

तुम्हीही शाळेत असताना कार्बन डायऑक्साईडबद्दल शिकला असाल, त्याची व्याख्याही माहिती असेल. पण, एका विद्यार्थ्याने परीक्षेत जे उत्तर लिहिलंय, ते वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

What is carbon dioxide? You won't be able to help but laugh after reading the student's answer. | कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? विद्यार्थ्याचे उत्तर वाचून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू

कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? विद्यार्थ्याचे उत्तर वाचून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू

Viral Video News: सोशल मीडिया हे जसे माहिती आणि घटना घडामोडी जाणून घेण्याचे माध्यम आहे. तसेच ते मनोरंजनाचेही माध्यम बनले आहे. अनेक मजेशीर व्हिडीओ, फोटो आणि आणि मीम्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका विद्यार्थ्याने परीक्षेत लिहिलेले उत्तर वाचून सगळेच हसताहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एक रील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या रीलमध्ये एका विद्यार्थ्याने विज्ञानाच्या विषयातील एका प्रश्नाचे काय उत्तर लिहिले आहे, हे दिले गेले आहे. पाच गुणांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे जे उत्तर विद्यार्थ्याने लिहिले आहे, ते वाचून अनेक जण मजेशीर कमेंट्सही करत आहेत. 

कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय?

परीक्षेत अशा प्रश्न विचारण्यात आला की, कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? त्यावर विद्यार्थ्याने उत्तर लिहिलंय की, 'जेव्हा व्यक्तीचा जन्म कारमध्ये होतो, पण त्याचा मृत्यू कार बाहेर होतो, यालाच कार्बन डायऑक्साईड म्हणतात.' 


कार्बन डायऑक्साईडची ही व्याख्या वाचून लोक खळखळून हसत आहे. ही पोस्ट आतापर्यंत ४८ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. यावर लोक अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, याचा अर्थ आम्हाला चुकीचं शिकवलं गेलं आहे.' दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, 'वा... काय बुद्धी आहे भावाची.'  

Web Title: What is carbon dioxide? You won't be able to help but laugh after reading the student's answer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.