शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

समुद्रकिनाऱ्यावर दिसला मिनी गॉडझिला, कोण आहे हा प्राणी? पाहुनच उडतो थरकाप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:45 IST

हा प्राणी इतका भयंकर दिसतोय की त्याला पाहून कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढतात. व्हिडिओमध्ये काही लोक बीचवर फिरतानाही दिसत आहेत. पण त्यांना बघून जणू काही त्यांची नजर या प्राण्यावर पडलीच नाही.

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ समुद्रकिनाऱ्याचा आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महाकाय सरड्यासारखा प्राणी समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. हा प्राणी इतका भयंकर दिसतोय की त्याला पाहून कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढतात. व्हिडिओमध्ये काही लोक बीचवर फिरतानाही दिसत आहेत. पण त्यांना बघून जणू काही त्यांची नजर या प्राण्यावर पडलीच नाही.

हा व्हिडिओ oceanic.touch नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मिनी गॉडझिला समुद्रकिनाऱ्यावर तुमच्याकडे येताना दिसल्यास तुम्ही काय कराल?’

दरम्यान हा प्राणी कुठला आहे हा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर हा आहे marine laguna lizard. सरड्याच्याच प्रजातीतील एक प्राणी. दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर या देशातील एका बेटावर हा आढळतो. गॅलापॅगोस नावाच्या बेटावर हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. रॉबेट्रो ओशाव या समुद्री जीवनाचं चित्रिकरण करणाऱ्या निर्मात्यानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो नंतर oceanic.touch नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. हा प्राणी सरड्याच्या प्रजातीतील असला तरी तो समुद्रात पोहण्यात एक्सपर्ट आहे. खोल समुद्रात जाऊन तो आपलं पोट भरतो. शिवाय हा समुद्र किनाऱ्यावरही येतो. माणसांना यापासून फार कमी धोका असतो, त्यामुळे दिसायला भयानक असला तरीही याला स्थानिक लोक घाबरत नाही. या व्हिडिओला आतापर्यंत २२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या अव्याहतपणे सुरू आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, वापरकर्ते सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकांनी  प्रश्न केला आहे की, हा कोणता प्राणी आहे? त्याच वेळी, काहींना तो इगुआनासारखा दिसतो. तथापि, असे काही वापरकर्ते आहेत ज्यांना हा प्राणी पाहिल्यानंतर ज्युरासिक पार्क चित्रपटाची आठवण झाली असल्याचं सांगितलं. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘हा खूप भयानक प्राणी आहे. व्हिडीओ बनवण्यापेक्षा ओरडत पळून जाणे चांगले.” त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, हा प्राणी मोठ्या सरड्यासारखा दिसतो. मी माझ्या घराच्या मागील अंगणातही मी पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम