Video: लग्नसोहळा अन् रोमँटिक फोटोशूट; डान्स करताना फजिती, कपलसोबत झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:55 IST2023-01-22T14:54:10+5:302023-01-22T14:55:01+5:30
लग्नाचा सीझन असो वा नसो, पण लग्नाच्या संबंधित दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Video: लग्नसोहळा अन् रोमँटिक फोटोशूट; डान्स करताना फजिती, कपलसोबत झालं असं काही...
लग्नाचा सीझन असो वा नसो, पण लग्नाच्या संबंधित दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी हे व्हिडिओ मन जिंकतात, तर कधी खूप हसायला देखील भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनेकदा लग्नाआधी आणि लग्नानंतर काही लोक प्री-वेडिंग फोटोशूटच्या माध्यमातून हा खास क्षण आणखी अविस्मरणीय बनवतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू आणि वर रोमँटिक स्टाईलमध्ये वेडिंग पोझ देताना दिसत आहेत, पण यादरम्यान असे काही घडते, जे पाहून तुम्ही क्षणभर थक्क व्हाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे लग्नादरम्यान वेडिंग फोटोशूट करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, चित्रपटांप्रमाणेच वधू-वरांना स्टेजवर डान्स करताना रोमँटिक पोझ द्याव्या लागल्या. परंतु याचदरम्यान दोघांचे नियंत्रण सुटल्याने वधू वराच्या हातातून निसटते आणि जमीनीवर पडते. या वेळी उपस्थित लोकांना आपला हशा आवरता आला नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ jaipur_weddings नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत ९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. तर ५ लाख ४५ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा व्हिडिओ खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.