लग्नातील पाहुण्यांना दिले जाते इंजेक्शन; भारतात कुठून सुरू झाला हा नवीन ट्रेंड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:00 IST2025-11-28T10:59:36+5:302025-11-28T11:00:11+5:30
लग्नातील पाहुणे आरामात सोफ्यांवर, खुर्च्यांवर बसलेले असतात आणि डॉक्टर त्यांना इंजेक्शन देतात.

लग्नातील पाहुण्यांना दिले जाते इंजेक्शन; भारतात कुठून सुरू झाला हा नवीन ट्रेंड?
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतात लग्नात वऱ्हाडी मंडळींना एक इंजेक्शन दिले जात असल्याचे आढळले आहे. सर्व वऱ्हाडी मंडळी आनंदाने हे इंजेक्शन टोचून घेतात. त्यासाठी उत्तम डॉक्टरांची नियुक्ती केली जाते.
लग्नातील पाहुणे आरामात सोफ्यांवर, खुर्च्यांवर बसलेले असतात आणि डॉक्टर त्यांना इंजेक्शन देतात. त्याला थकवा आणि नशा उतरण्याचा लक्झरी उपाय म्हणून वापरले जाते. रात्री उशिरापर्यंत पार्टी करणाऱ्यांचा थकवा दूर करणे, शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित करणे यासाठी हा इलाज केला जातो. या इंजेक्शनमध्ये इलेक्ट्रॉलाइट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर घटक असतात. त्यामुळे हे इंजेक्शन घेतल्यावर लगेच ताजेतवाने वाटते. अहान पांडेची बहीण अलाना पांडे हीच्या लग्नापासून ही गोष्ट जास्त व्हायरल झाली आहे.