Watch viral video of elephant and its calf broke a walled construction | Video : आपल्या पिल्लासह कैद झाली होती हत्तीण, बघा भिंत तोडून कशी करून घेतली सुटका!
Video : आपल्या पिल्लासह कैद झाली होती हत्तीण, बघा भिंत तोडून कशी करून घेतली सुटका!

दोन हत्तीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.  यात एक हत्तीण तिच्या पिल्लासोबत एका ठिकाणी अडकते. मग तेथून बाहेर येण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. अनेक प्रयत्न करून ती थकलेली असते. अशात तिथे असलेली भिंत तोडून ती आपल्या पिल्लासोबत स्वत:ची सुटका करवून घेते.

आयएफएस अधिकारी वैभव सिंह यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्याय. सोबतच त्यांनी लिहिले की, 'एक हत्तीण आणि तिचं पिल्लू भिंतींच्या मागे अडकले आहेत आणि हत्तीण भिंत तोडून बाहेर पडली'. ही घटना Rawasan-Sonanadi कॉरिडोर येथील आहे.

हा व्हिडीओ उत्तराखंडमधील आहे. यात तुम्ही बघू शकता की, लोखंडी दरवाजा बंद आहे. त्यामुळे तेथून बाहेर पडण्यासाठी हत्तीणीला भिंत तोडावी लागली. आधी तर असं वाटलं की, हत्तीण तिथेच अडकेल, पण नंतर भिंत पाडली आणि त्यांची सुटका झाली.


Web Title: Watch viral video of elephant and its calf broke a walled construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.