Watch viral video candidates trip fall during miss universe | Miss Universe 2019 स्पर्धेतील 'या' मॉडल्ससाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण....
Miss Universe 2019 स्पर्धेतील 'या' मॉडल्ससाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण....

मिस यूनिव्हर्स २०१९ या ब्युटी स्पर्धेचा किताब यावेळी साउथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने जिंकला. अमेरिकेच्या अटलांटामध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. ९० देशातील सुंदरींनी यात सहभाग घेतला होता. जोजिबिनीने किताब तर जिंकलाच, पण सोबतच इतर काही स्पर्ध तरूणींनी लोकांची मने जिंकली. झालं असं की, बिकीनी राउंडमध्ये अनेक मॉडल्स स्टेजवर घसरून पडल्या. पण त्यांनी धीर सोडला नाही किंवा त्या घाबरल्या नाही. त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

झालं असं की, हा राउंड सुरू असताना स्टेज भिजलेला होता. त्यामुळेच स्पर्धक तरूणी घसरून पडल्या. पण त्यांनी वॉक सुरूच ठेवलाच. इतकेच काय तर त्यांनी स्वत:लाच प्रोत्साहित करण्यासाठी टाळ्याही वाजवल्या. लोकांनीही त्यांना साथ दिली. काही वेळाने स्वीपर आला आणि त्याने फ्लोर साफ केला.

मिस फ्रान्स आणि मिस मलेशिया या दोघी तर स्टेजवर पूर्णपणे पडल्या. पण त्या चेहऱ्यावर हसू घेऊन उठल्या आणि पुन्हा वॉक करू लागल्या. यावेळी लोक टाळ्या वाजवून त्यांनी प्रोत्साहन देत होते. स्टेजवर मिस उरूर्ग्वे, मिस इंडोनेशिया, मिस मलेशिया, मिस न्यूझीलॅंड आणि मिस माल्टा यांचा समावेश होता. 


Web Title: Watch viral video candidates trip fall during miss universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.