Watch Olympian Katie Ledecky swim a lap with a glass of milk on her head video goes viral | Viral Video : याला म्हणतात परफेक्शन, दुधाचा ग्लास डोक्यावर ठेवून केलं स्वीमिंग

Viral Video : याला म्हणतात परफेक्शन, दुधाचा ग्लास डोक्यावर ठेवून केलं स्वीमिंग

अशा काही गोष्टी असतात ज्या अनेक लोकांना येतात. पण काही लोक या गोष्टींमध्ये इतके परफेक्ट असतात की, बघून आश्चर्य वाटतं. आता हीच अ‍ॅथलीट बघा ना...हीचं नाव कॅटी लेडेकी असून ती अमेरिकेची प्रसिद्ध स्विमर आहे. कॅटीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ती पूलमध्ये स्वीमिंग करताना दिसत आहे. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं? तर यात ती नॉर्मल स्वीमिंग करत नाहीये. कॅटीने स्वीमिंग करताना डोक्यावर चक्क एक दुधाचा ग्लास ठेवलाय. ग्लासातील एक थेंबही दूध खाली न पडू देता तिला स्वीमिंग करताना बघणं एक रोमांचक अनुभव ठरतो आहे.

हा व्हिडीओ बघा. यात कॅटी  डोक्यावर चॉकलेट मिल्कचा ग्लास ठेवून स्वीमिंग करत आहे. या पोस्टच्या कॅप्शनला तिने लिहिले की, 'हे माझ्या करिअरमधील बेस्ट स्वीमिंग होतं. कॅटीने यूएसए टुडेला सांगितलं की, यावेळी स्वीमिंग करताना तिने तिच्या कोरला फार हार्ड करून ठेवलं होतं. फार जास्त कंट्रोल मला ठेवावा लागला होता.

कॅटीचा हा व्हिडीओ पाहून लोक फारच अवाक् झाले आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलंय. दरम्यान २३ वर्षीय कॅटी लेडेकी ने रिओ ऑलंम्पिक-२०१६ मध्ये महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल स्वीमिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं. इतकेच नाही तर ती एकुलती एक अशी महिला स्वीमर आहे जिच्या नावावर १५ वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. सध्या ती टोकिया ऑलंम्पिकची तयारी करत आहे. ही स्पर्धा सध्या कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपलाय एक कुत्रा; अनेकजण शोधून थकले, तुम्हाला सापडतो का बघा....

जबरदस्त! गर्लफ्रेन्डसाठी 'या' बॉयफ्रेन्डने जे केलं ते पाहून व्हाल भावूक, म्हणाल - प्रेम असावं तर असं!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Watch Olympian Katie Ledecky swim a lap with a glass of milk on her head video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.