VIDEO : पाकिस्तानी टिकटॉक स्टारवर सिंहाकडून हल्ल्याचा प्रयत्न, बघा नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:42 IST2022-03-02T16:42:06+5:302022-03-02T16:42:25+5:30

पाकिस्तानी टिकटॉक स्टार हरीम शहा एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हरीमने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून यात ती सिंहासोबत फोटो काढताना दिसत आहे. 

Watch Lion almost attacks on Pakistani tiktok star Hareem Shah | VIDEO : पाकिस्तानी टिकटॉक स्टारवर सिंहाकडून हल्ल्याचा प्रयत्न, बघा नेमकं काय झालं?

VIDEO : पाकिस्तानी टिकटॉक स्टारवर सिंहाकडून हल्ल्याचा प्रयत्न, बघा नेमकं काय झालं?

पकिस्तानची टिकटॉक स्टार हरीम शहा (Hareem Shah) ही नेहमीच वादांमुळे चर्चेत असते. यावेळी ती कोणत्या वादामुळे नाही तर सिंहाच्या हल्ल्यामुळे  चर्चेत आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हरीमने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून यात ती सिंहासोबत फोटो काढताना दिसत आहे. 

पण अचानक फोटो फोटो काढता काढता सिंहाचा मूड बदलतो आणि तो हरीमवर हल्ला केल्यासारखा वागू लागतो. ज्या व्यक्तीने सिंहाला पकडलेलं होतं त्यालाही सिंह कंट्रोल होत नव्हता. अशात परिस्थिती बिकट झाली होती. या व्हिडीओत बघाला  मिळतं की, हरीम सिंहासोबत फोटो काढण्यासाठी पोज देते. पण काही वेळातच ती सिंहापासून दूर पळताना दिसते. अनेकांनी तिचा हा व्हिडीओ रिशेअर केला आणि त्यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत.

एकाने कमेंट करत लिहिलं केलं 'चांगलं टार्गेट होतं. सिंहाला सगळं काही समजतं'. एकाने लिहिलं की, 'सिंहाला समजतं की कुणावर हल्ला करायचा कुणावर नाही'. आणखी एकाने लिहिलं की, 'सिंह एक जंगली प्राणी आहे. त्याला पाळिव बनवल्यावर किंवा शो पीस म्हणून वापरल्यावर असंच होईल'. 
 

Read in English

Web Title: Watch Lion almost attacks on Pakistani tiktok star Hareem Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.