VIDEO : सिग्नल तोडल्यावर झाली जोरदार टक्कर, एक कार उडून दुसऱ्या कारवर जाऊन पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 18:07 IST2021-11-23T18:05:27+5:302021-11-23T18:07:43+5:30
US Car Accident Video : यात दोन कारची भयावह टक्कर झाली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का तर बसला आहेच सोबतच हैराणही झालेत.

VIDEO : सिग्नल तोडल्यावर झाली जोरदार टक्कर, एक कार उडून दुसऱ्या कारवर जाऊन पडली
सिनेमात भलेही तुम्ही कितीही भयानक अॅक्शन सीन पाहिले तरी समोर काही अपघात घडला तर हृदयाचे ठोके चुकतात. अशाच एका खतरनाक अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन कारची भयावह टक्कर झाली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का तर बसला आहेच सोबतच हैराणही झालेत.
हा व्हिडीओत १७ ऑक्टोबर २०२१ चा आहे. ही घटना यूएसमधील (US Car Accident Video) इंडियानातील आहे. यात तुम्ही बघू शकता की, एका कार समोरून येत आहे, त्या कारला दुसऱ्या बाजूने येत असलेली कार जोरदार टक्कर मारते. ती कार थेट तिसऱ्या कारला जाऊन जोरात टक्कर देते.
नंतर एक कार दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारच्या बोनेटवर दिसते. अपघातात जवळपास एकूण ६ कारचं नुकसान झालं होतं. सुदैवाने या अपघातात कुणाला काही इजा झाली नाही. ट्विटरसोबतच हा व्हिडीओ यूट्यूबवरही शेअर करण्यात आला आहे. लोक व्हिडीओ पाहूनही हैराण आहेत की, हा अपघात नेमका झाला कसा. हा तर सिनेमात दाखवतात त्यापेक्षा खतरनाक स्टंट होता.