अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:05 IST2025-09-15T19:02:16+5:302025-09-15T19:05:32+5:30
Volcano Viral Video: आकाश व्यापून टाकणारी राख, समुद्रात उसळलेल्या लाटा; पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केले थरारक दृश्य.

अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
Volcano Viral Video: कधी कधी फिरायला गेलेले लोक आपल्या कॅमेऱ्यात अशा घटना कैद करतात, ज्या कल्पनेपलीकडच्या असतात. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 2,00,000 वर्षे जुन्या इटलीतील जगप्रसिद्ध माउंट स्ट्रॉम्बोली (Mount Stromboli) ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला. यावेळी पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी बोटीतून पळ काढला.
घटना कॅमेऱ्यात कैद
Boaters capture footage of an erupting Mount Stromboli pic.twitter.com/W7NFlBd2tW
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 15, 2025
काही पर्यटक समुद्रात असलेल्या छोट्या बेटाजवळ गेले होते. परत येताना अचानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. बोटीवरच्या व्यक्तीने त्या क्षणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये दिसते की, ज्वालामुखी फुटताच समुद्रात प्रचंड लाटा उठतात. ज्वालामुखीतून उसळलेल्या राखेने तर संपूर्ण आकाश व्यापले होते. दृश्य इतके भयानक होते की, अनेकांना ते “परमाणु बॉम्बचा स्फोट” वाटला. यादरम्यान, बोटीचालक जीव वाचवण्यासाठी बोट वेगाने पळवून लागतो.
जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुख्यांपैकी एक
माउंट स्ट्रॉम्बोली हा जगातील सर्वात जुना व सक्रिय ज्वालामुखी मानला जातो. वैज्ञानिकांच्या मते हा सुमारे २ लाख वर्षांपूर्वी तयार झालेला आहे. दरवर्षी येथे लहान-मोठे उद्रेक येथे होतात. मात्र, या व्हायरल व्हिडिओतील उद्रेक नेमका कधी झाला आणि यात कोणी जखमी झाले का, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर खळबळ
हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE या एक्स (पूर्वी ट्विटर) हँडलवर शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून 4 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. एका युजरने लिहिले- “हे पाण्यात मी पाहिलेलं सर्वात भीतीदायक दृश्य आहे.” दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “एखाद्या हॉलीवूड चित्रपटाच्या सीनसारखे वाटते.”