झोपेत बडबडणं आणि चालण्याबाबत ऐकलं असेलच, पण व्यक्तीने गिळले चक्क नकली दात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:03 IST2024-12-17T15:01:33+5:302024-12-17T15:03:21+5:30

एका व्यक्तीने झोपेत त्याचे नकली दात म्हणजे कवळी गिळली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गिळलेले हे दात त्याच्या फुप्फुसात जाऊन अडकले होते.

Visakhapatnam man swallows dentures teeth in sleep removed from lung | झोपेत बडबडणं आणि चालण्याबाबत ऐकलं असेलच, पण व्यक्तीने गिळले चक्क नकली दात!

झोपेत बडबडणं आणि चालण्याबाबत ऐकलं असेलच, पण व्यक्तीने गिळले चक्क नकली दात!

Man Swallows Dentures Teeth In Sleep : सोशल मीडिया सध्या एका धक्कादायक घटनेची चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीसोबत असं काही झालं जे वाचून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. तुम्हाला माहीत असेलच की, काही लोकांना झोपेत बडबड करण्याची आणि चालण्याची सवय असते. मात्र, एका व्यक्तीने झोपेत जे केलं त्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. एका व्यक्तीने झोपेत त्याचे नकली दात म्हणजे कवळी गिळली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गिळलेले हे दात त्याच्या फुप्फुसात जाऊन अडकले होते.

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममधील ही घटना आहे. इथे ५२ वर्षीय या व्यक्तीने झोपेत त्याचे नकली दात गिळले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर यासंबंधी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ बघून लोकांनी कपाळावरच हात मारून घेतला. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की, हे झालं कसं? असं सांगण्यात आलं की, दात गिळल्याचं व्यक्तीच्या लक्षात तेव्हा आलं जेव्हा त्याची तब्येत जास्त बिघडली. त्यानंतर त्याना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

असं सांगण्यात आलं की, फुप्फुसात अडकलेल्या दातांमुळे व्यक्तीला सतत खोकला येत होता, ज्यानंतर त्याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय व्यक्ती गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नकली दात म्हणजे दातांच्या कवळीच्या वापर करत होती. मात्र, दातांचा सेट जरा सैल झाला होता. अशात एका रात्री नकळत त्यानी नकली दातच गिळले. जे फुप्फुसात जाऊन अडकले.

डॉक्टरांनुसार, X-ray आणि CT scan मध्ये दातांचा सेट फुप्फुसात अडलेला दिसला. ज्यानंतर ब्रोंकोस्कोपी करून दातांचा सेट काढण्यात आला. आता रूग्ण पूर्णपणे बरा आहे.

Web Title: Visakhapatnam man swallows dentures teeth in sleep removed from lung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.