VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:41 IST2025-09-23T11:40:47+5:302025-09-23T11:41:30+5:30
पण या महिलेने इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर जे काही केले, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक चमत्कार घडताना आपण पाहिले आहेत, पण अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात घडलेली एक घटना सध्या जगभर चर्चेचा विषय बनली आहे. येथे कॅरी एडवर्ड्स नावाच्या एका महिलेने गंमत म्हणून ChatGPTला लॉटरीचे नंबर विचारले आणि या बॉटने दिलेल्या नंबरमुळे ती एका झटक्यात करोडपती झाली. पण या महिलेने इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर जे काही केले, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
कशी लागली १.३२ कोटींची लॉटरी?
साऊथ फ्लोरिडा मीडियाच्या रिपोर्टनुसार, कॅरी एडवर्ड्स यांनी ८ सप्टेंबर रोजी व्हर्जिनिया लॉटरी पॉवरबॉल ड्रॉमध्ये भाग घेतला होता. लॉटरी खेळताना त्यांनी चॅट जीपीटीला काही नंबर निवडण्यासाठी सांगितले. एआयच्या या नंबरवर विश्वास ठेवून कॅरी यांनी तिकीट खरेदी केले आणि त्यांना ५०,००० डॉलर म्हणजे जवळपास ४४ लाख रुपयांचे बक्षीस लागले. त्यांनी १ डॉलर खर्च करून ‘पॉवर प्ले’चा पर्यायही निवडला होता. ज्यामुळे त्यांचे बक्षीस तिप्पट झाले आणि थेट १५०,००० डॉलर (१.३२ कोटी रुपये) झाले.
एवढी मोठी रक्कम जिंकल्याचे कळल्यावर कॅरी यांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही. कोणातरी आपल्यासोबत मस्करी करत आहे असेच त्यांना वाटले. पण, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आणि सुखद धक्का ठरला.
करोडोंची रक्कम दान करण्याचा निर्णय!
सर्वसामान्य लोक लॉटरी जिंकल्यानंतर आलिशान गाड्या, बंगले आणि पार्ट्यांवर पैसे उधळतात, पण कॅरी एडवर्ड्स यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी जिंकलेली संपूर्ण रक्कम दान करण्याची घोषणा केली. "ही माझ्यासाठी एक दैवी देणगी आहे आणि मी हे पैसे समाजाच्या कल्याणासाठी वापरेन," असे कॅरी यांनी म्हटले.
'या' तीन संस्थांना मिळणार मदत
कॅरी यांनी जिंकलेली १.३२ कोटींची रक्कम तीन वेगवेगळ्या संस्थांना दान केली आहे. त्यांच्या पतीच्या आजारावर संशोधन करणारी 'असोसिएशन फॉर फ्रंटोटेम्पोरल डीजनरेशन', गरजू लोकांना अन्न पुरवण्याचे काम करणारी 'शॅलोम फार्मस', अमेरिकेच्या नौदलातील सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी काम करणारी 'नेव्ही-मरीन कॉर्प्स रिलीफ सोसायटी' या संस्थांना त्यांनी पैसे दिले.